युवतीची हत्या करून जाळले

By Admin | Updated: June 30, 2014 00:37 IST2014-06-30T00:37:00+5:302014-06-30T00:37:00+5:30

शहरातील शासकीय विश्रामगृहालगत मोकळ्या परिसरातील झुडपात एका अज्ञात युवतीचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. रविवारी सकाळी उजेडात आलेल्या या घटनेत युवतीची हत्या

The woman was burnt and burnt | युवतीची हत्या करून जाळले

युवतीची हत्या करून जाळले

वरोरा शहरात खळबळ : तीन वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती
वरोरा (चंद्रपूर) : शहरातील शासकीय विश्रामगृहालगत मोकळ्या परिसरातील झुडपात एका अज्ञात युवतीचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. रविवारी सकाळी उजेडात आलेल्या या घटनेत युवतीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी नंतर तिचे प्रेत जाळून टाकले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वरोरा शहरातील शासकीय विश्रामगृहालगत मोकळी जागा असून या परिसरात काही महिला रविवारी सकाळी प्रात:र्विधीसाठी गेल्या असता, त्यांना प्रेत जळालेल्या अवस्थेत आढळून आले. कुत्र्यांचे टोळके त्या प्रेताचे लचके तोडत असल्याचे भयावह चित्र या महिलांनी पाहिले. दरम्यान, सकाळी ६ वाजताच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच, वरोरा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत युवतीचे वय २१ ते २५ च्या दरम्यान असावे, असा अंदाज आहे. तिची जीभ बाहेर आल्याचे दिसून आले. त्यामुळे तिची प्रथम गळा दाबून हत्या केली असावी व त्यानंतर प्रेताला झुडपाजवळ ठेवून ते जाळले असल्याचा अंदाज प्राथमिक चौकशीत पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सदर प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. पे्रताची ओळख पटविण्याचे प्रयत्न वरोरा पोलिसांकडून केले जात आहे.

 

Web Title: The woman was burnt and burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.