महिला उपनिरीक्षकासह पोलिसांना मारहाण
By Admin | Updated: September 19, 2016 00:35 IST2016-09-19T00:35:12+5:302016-09-19T00:35:12+5:30
पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर येथील शंकरमठ भागातील मोकाशी गॅरेजजवळ शनिवारी संध्याकाळी घडली

महिला उपनिरीक्षकासह पोलिसांना मारहाण
पुणे : अकस्मात मृत्यूच्या चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर येथील शंकरमठ भागातील मोकाशी गॅरेजजवळ शनिवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी चार महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविकांत किसन चव्हाण (वय ४६), महेश रविकांत चव्हाण (वय १९), अमित काळुराम गोयरे (वय ३७), हर्षल गणेश खळदकर (वय १९), अमित काळुराम गोयर याच्यासह त्याची आई आणि अन्य दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज गायकवाड याचा काही दिवसांपूर्वी अकस्मात मृत्यू झाला होता. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या चौकशीसाठी उपनिरीक्षक घाटे, पोलीस शिपाई खताळ आणि खांडवे मोकाशी गॅरेज येथे गेल्या होत्या. रविकांत चव्हाण याच्याकडे चौकशी सुरू असताना त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. आरडाओरडा करून अन्य आरोपींना बोलावून घेतले. या सर्वांनी धक्काबुकी करीत हाताने मारहाण केली.