लग्नाचे आमिष दाखवून महिला डॉक्टरवर दोन वर्ष बलात्कार
By Admin | Updated: February 5, 2016 15:20 IST2016-02-05T14:17:15+5:302016-02-05T15:20:22+5:30
औरंगाबादमध्ये एका महिला डॉक्टरने सहकारी पुरुष डॉक्टरवर बलात्काराचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून महिला डॉक्टरवर दोन वर्ष बलात्कार
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. ५ - औरंगाबादमध्ये एका महिला डॉक्टरने सहकारी पुरुष बीएचएमएस डॉक्टरवर बलात्काराचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील सिडको एन-5 भागात घडली. विवेक पाटील (31, रा. टाकळी, जि. जळगाव) असे डॉक्टरचे नाव आहे. पीडित महिला डॉक्टरने डॉ. विवेक पाटील यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.
विवेक पाटील यांनी लग्नाचे आमिष दाखवून दोनवर्ष माझ्यावर बलात्कार केला असे पीडित महिला डॉक्टरने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डॉ. विवेक पाटील यांना अटक केली आहे.
जातीच्या मुद्यावरुन डॉ. विवेक यांनी लग्नाला नकार दिल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला आहे. या प्रकरणी सिडको पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. ते दोघे सिडकोतील धनवई हाँस्पीटलमध्ये काम करीत होते. तपास फौजदार राजकुमार पाडवी करीत आहेत.