जळालेल्या महिलेचा मृत्यू; दोघांना अटक
By Admin | Updated: September 27, 2016 21:12 IST2016-09-27T21:12:19+5:302016-09-27T21:12:19+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथे जळालेल्या महिलेचा नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान २५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.

जळालेल्या महिलेचा मृत्यू; दोघांना अटक
ऑनलाइन लोकमत
सिद्धेश्वर, दि. 27 - औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथे जळालेल्या महिलेचा नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान २५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी मयत महिलेच्या सासरच्या सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
नंदगाव येथील सविता विठ्ठल गोरे विवाहितेस १० सप्टेंबर रोजी रॉकेल टाकून जाळल्याची घटना घडली होती. उपचारासाठी महिलेस नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने विवाहितेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी सासरकडील मंडळीविरूद्ध औंढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोघांना २४ सप्टेंबर रोजी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास पोनि केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिता दिनकर करीत आहेत.