शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महिलेला चाचणी न करताच ठरविले कोरोनाबाधित; मृतदेह अवहेलना प्रकरणाला वेगळं वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 05:56 IST

धक्कादायक! आयसीएमआर पोर्टललाही नोंद नाही

सोमनाथ खताळ

बीड : बीडमधील मृतदेह अवहेलना प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. कोरोनाबाधित असल्याने मृतदेह  परत आणून नगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करीत नातेवाईकांवर गुन्हा दाखल करणारा आरोग्य विभाग अडचणीत सापडला आहे. ज्या महिलेचा मृतदेह परत बोलावला, ती महिला कोरोनाबाधित असल्याचा कसलाच पुरावा आरोग्य विभागाकडे नाही. विशेष म्हणजे त्या महिलेची आयसीएमआर पोर्टललाही नोंद नसल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. यामुळे प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे.

लता सुरवसे (३२, रा. कुंभारवाडी, ता. गेवराई) या महिलेला कोरोनाबाधित म्हणून २३ एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. १७ मे रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यामुळे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कारांसाठी गावी गेले. परंतु, प्रशासनाने त्यांना परत बोलावून घेतले. बीडमध्ये नगरपालिकेने अंत्यसंस्कार केले; तर जिल्हा रुग्णालयातील नर्सने नातेवाईकांनी वैद्यकीय तपासणी न करता आणि परवानगी न  घेता मृतदेह पळविल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली.  

ज्या महिलेचा मृतदेह परत आणला, तिची कोरोनाबाधित म्हणून कोठेच नोंद नसल्याचे समोर आले आहे. वॉर्डमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मात्र कसलाही पुरावा न पाहता २४ दिवस कोरोनाबाधित म्हणून उपचार केले आहेत. केवळ केसपेपरवर कोणीतरी पॉझिटिव्ह असे लिहिलेले आहे.

डॉक्टर म्हणतात, नातेवाइकांचा दबावया प्रकरणात येथील डॉ. गिरीश गुट्टे यांचा जबाब घेण्यात आला असून, नातेवाईकांनी दबाव टाकल्यानेच आपण अँटिजन टेस्ट केेल्याचे त्यांनी सांगितले. वॉर्डबॉय, परिचारिका, तंत्रज्ञ या सर्वांचे जबाब घेतले असून, मृत्यूनंतरची चाचणी निगेटिव्ह असल्याचे त्यांचे मत आहे. 

या प्रकरणातील चौकशी अहवाल आला होता. परंतु, नातेवाईकांचे जबाब नसल्याने तो परत पाठविला आहे. यात सर्व बाजू समजावून घेतल्या जातील. महिलेची नोंद आयसीएमआर पोर्टलला आहे की नाही, याची तपासणी करण्यासही सांगितले आहे.  - डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

 

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस