अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

By Admin | Updated: November 6, 2015 01:35 IST2015-11-06T01:35:07+5:302015-11-06T01:35:07+5:30

लग्नाकरिता आलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर चार जणांनी सतत लंैगिक अत्याचार केला. तिला गुंगीचे औषध देऊन या प्रकाराचे चित्रीकरणही केले. ते दाखवून तिच्याकडे सतत शरीरसुखाची

The woman commits suicide due to the violence | अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

वर्धा : लग्नाकरिता आलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर चार जणांनी सतत लंैगिक अत्याचार केला. तिला गुंगीचे औषध देऊन या प्रकाराचे चित्रीकरणही केले. ते दाखवून तिच्याकडे सतत शरीरसुखाची मागणी करण्यात येत होती. या त्रासाला कंटाळून तिने अखेर स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघड झाली आहे.
या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघे फरार आहेत.
अटकेत असलेल्यांची नावे बोधीनंद पोथारे व निखिल नाखले अशी आहेत. या दोघांची
रवानगी कारागृहात करण्यात आली असून, अन्य दोघांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The woman commits suicide due to the violence