शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण नसताना मराठ्यांना सर्वाधिक नोकऱ्या! भुजबळांनी आकडेवारीच मांडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 16:23 IST

हुशार असूनही आरक्षण नसल्याने कमी क्षमतेच्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता.

मराठा समाजाला आरक्षणाचा विषय आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात जात असताना ओबीसी समाजाने एल्गार मोर्चे घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापू लागले आहे. असे असताना हुशार असूनही आरक्षण नसल्याने कमी क्षमतेच्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता. यावर आज हिंगोलीतील एल्गार मोर्चामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षणातून मिळालेल्या सरकारी नोकऱ्यांची टक्केवारीच जाहीर केली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण नाही असे म्हणताय परंतू आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजालाच झाल्याचा दावा भुजबळांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणात ८५ टक्के जागा या मराठा समाजालाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. आयएएसमध्ये १५.५० टक्के, आयपीएसमध्ये २८ टक्के अधिकारी हे मराठा आहेत. 

आरक्षण सोडून उरलेल्या ४० टक्के जागांमध्येही मराठा समाजाचे अधिकारी, आमच्या २७ टक्के ओबीसीमध्येही मराठा समाजाचे अधिकारी असा डबल फायदा मराठा समाजाला झाला आहे. यातून हेच सिद्ध होतेय की आरक्षण नसतानाही मराठा समाजाला सर्वाधिक फायदा होतोय, असा आरोप भुजबळांनी केला. 

मराठा समाजाला लोकसेवा आयोगातील प्रतिनिधित्व ए ग्रेड - 33.50 टक्के, बी ग्रेड - 29 टक्के, सी ग्रेड - 37 टक्के, डी ग्रेड - 36  टक्के एवढे मिळाले आहे. तर IAS - 15.50 टक्के, IPS - 28 टक्के आणि IFS - 18 टक्के अधिकारी हे मराठा आहेत. मंत्रालय कॅडरमध्ये ए ग्रेड - 37.50, बी ग्रेड - 52.30, सी ग्रेड - 52, डी ग्रेड - 55.50 टक्के एवढ्या जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर गेल्या वर्षभरातील ६५० नियुक्त्यांपैकी ८५ टक्के नियुक्त्या या मराठा समजाच्या उमेदवारांना मिळाल्याचा दावा भुजबळांनी केला आहे.

मराठा समाजाला मिळालेला निधी...अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून 70 हजार लाभार्थ्यांना 5160 कोटी रुपये देण्यात आले.  राजर्षी शाहू महाराज शिष्युवृत्ती, पंजाबराव देशमुख महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला 10,500 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा दावा भुजबळ यांनी करताना ओबीसींना अद्यापही तेवढा निधी मिळाला नसल्याचा दावा केला.  

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील