शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
3
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
4
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
5
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
6
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
7
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
8
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
9
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
10
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
11
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
12
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
13
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
14
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
15
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
16
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
17
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
18
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
19
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान
20
Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

मोदी नसते तर देश १५० वर्षे मागे गेला असता : डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 12:05 IST

अध्यात्मिक ताकद वाढल्याशिवाय देशाची सेवा करण्याची ताकद निर्माण होणार नाही...

ठळक मुद्देवीरमाहेश्वर जंगम व वीरशैव लिंगायत समाज यांच्या वतीने सन्मान

पुणे : राजकारण म्हणून नव्हे तर राष्ट्रकारण म्हणून हे पद मी स्वीकारले. मागील आठवड्यात संसदेमध्ये काश्मीरचे ३७० कलम, तीन तलाक अशा अनेक चांगल्याा घडामोडी घडल्या. पंतप्रधान आहेत म्हणून आपल्या देशाचा विकास होत आहे. ते नसते तर आपण अजून १५० वर्ष मागे गेलो असतो, असे मत गुरुवर्य ष. ब्र. १०८ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केले. सर्व लिंगायत समाजाला एकत्र करून ओबीसी प्रमाणपत्रासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.वीरमाहेश्वर जंगम व वीरशैव लिंगायत समाज यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार गुरुवर्य ष. ब्र. १०८ डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन एरंडवणा येथील शामराम कलमाडी कॉलेज येथे करण्यात आले होते. यावेळी श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरु श्री. श्री. श्री. १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, गुरुवर्य ष. ब्र. १०८ डॉ. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, गुरुवर्य ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, गुरुवर्य ष. ब्र. १०८ गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज,गुरुवर्य ष. ब्र. १०८ गुरुसिद्ध मणिकंठ दहीवडकर महाराज आमदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक, वीर माहेश्वर जंगम संस्थेचे अध्यक्ष महेश कुगावकर आणि संस्थेचे  पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करण्यात आला. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘एक योगी, एक महाराज हे राजकारणामध्ये कसे जाऊ शकतात. असे प्रश्न निर्माण होऊन अनेकांच्या भुवया उंचावल्या. परंतु अशा योगी, महाराजांनीच सत्ता हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील योगीच आहेत. अंतर्मनाने ते योगी अवस्थेला पोहोचले आहेत. देशाची प्रगती करण्याची क्षमता अध्यात्मामध्ये आहे. अध्यात्मिक ताकद वाढल्याशिवाय देशाची सेवा करण्याची ताकद निर्माण होणार नाही.’मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘आपल्यासारख्या योगी लोकांनी राजकारणाला एक नवीन आयाम घालून दिला आहे. धर्माचे अनुष्ठान अधिकाधिक मिळेल यासाठी प्रयत्न करू. यातूनच भारताची प्रगती होईल.’ शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी