अवकाळीचे १० कोटी वाटपाविना पडून
By Admin | Updated: October 8, 2015 05:03 IST2015-10-08T05:03:28+5:302015-10-08T05:03:28+5:30
अमरावती विभागात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती व फळपिकांच्या नुकसानीकरिता शासनाने ५१ कोटी १९ लाख १४ हजारांचा निधी उपलब्ध केला होता

अवकाळीचे १० कोटी वाटपाविना पडून
अमरावती : अमरावती विभागात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती व फळपिकांच्या नुकसानीकरिता शासनाने ५१ कोटी १९ लाख १४ हजारांचा निधी उपलब्ध केला होता. यापैकी १० कोटी २२ लाख ५० हजारांच्या निधीचे वाटप बाकी आहे. हे वाटप ८० टक्के असून ९ हजार ६५० शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
अमरावती विभागासाठी २५ मे रोजीच्या निर्णयानुसार २१ कोटी २४ लाख ९४ हजार व ८ जुलैच्या आदेशान्वये २९ कोटी ९५ लाख असा ६४ लाख ९७ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला होता. ६४ हजार ९८८ खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी ९७ लाख ४४ हजार रुपयांचा निधी जमा केला आहे. परंतु अद्याप ९,६५० शेतकऱ्यांना १० कोटी २२ लाख ५० हजार रुपयांच्या मदतनिधीचे वाटप व्हायचे आहे. वाटपाची ही टक्केवारी ८०.०३ टक्के आहे.
अमरावती जिल्ह्णात २,०३२ शेतकऱ्यांना १ कोटी १९ लाख रुपयांचे वाटप अद्याप व्हायचे असून अकोला जिल्ह्णात ९७ शेतकऱ्यांना १ कोटी २ लाखांचे वाटप बाकी आहे.
यवतमाळ जिल्ह्णात ५,१२० शेतकऱ्यांना ६ कोटी ११ लाख ३८ हजारांचे वाटप अद्याप झालेले नाही. बुलडाणा जिल्ह्णात ३७ हजार, वाशिम जिल्ह्णात २४०१ शेतकऱ्यांना १ कोटी ८५ हजार ७६ हजारांचे वाटप बाकी आहे.