हेल्मेट नसल्याने गमावला जीव

By Admin | Updated: February 8, 2016 02:02 IST2016-02-08T02:02:12+5:302016-02-08T02:02:12+5:30

शासनाने केलेल्या हेल्मेटसक्तीमुळे पुणे शहराचे तापमान वाढले आहे. पुणे शहरात हेल्मेटच्या वापराबाबत भिन्न मतप्रवाह असून काहींनी हेल्मेटच्या वापराला विरोध केला आहे

Without helmet, lost organism | हेल्मेट नसल्याने गमावला जीव

हेल्मेट नसल्याने गमावला जीव

पुणे : शासनाने केलेल्या हेल्मेटसक्तीमुळे पुणे शहराचे तापमान वाढले आहे. पुणे शहरात हेल्मेटच्या वापराबाबत भिन्न मतप्रवाह असून काहींनी हेल्मेटच्या वापराला विरोध केला आहे, तर काहींनी हेल्मेटसक्तीचे समर्थन केले आहे. अशातच धानोरी-विश्रांतवाडी रस्त्यावर गोकुळनगरमध्ये शनिवारी (दि.६) रात्री अकराच्या सुमारास कारने उडवल्याने जखमी झालेला दुचाकीस्वार रुग्णालयात नेण्यापूर्वीच गतप्राण झाला. या दुचाकीस्वारानेही हेल्मेट परिधान केलेले नव्हते, तसेच त्याच्या डोक्याव्यतिरीक्त कुठेही दुखापत झालेली नव्हती.
सुनीलकुमार लल्लन तिवारी (वय ३५, रा.मुंजाबावस्ती, धानोरी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सुनीलकुमारवर रविवारी (दि.७) सायंकाळी सहाच्या सुमारास
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)

सुनीलकुमारच्या डोक्याला इजा झाली होती, मात्र त्याच्या डोक्यातून जास्तीचा रक्तस्त्राव होत नव्हता.
कदाचित त्याच्या डोक्याला अथवा मेंदूला गंभीर इजा झाल्याने मृत्यु झाला असण्याची शक्यता असून त्याने जर हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याला गंभीर दुखापत झाली नसती. तसेच घटनास्थळी पोहचून त्याला रुग्णालयात नेईपर्यंत २५ मिनीटांचा कालावधी लागला.
अपघातानंतर तेथे जमलेल्या नागरीकांनी तत्परता दाखवून त्याला रुग्णालयात तत्काळ भरती केले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, तसेच असे सुनीलकुमारला रुग्णालयात नेणारे धनंजय जाधव यांनी सांगितले.
सुनीलकुमारचा अपघात झाल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच तरुण व तरुणी असलेले २ अज्ञात डॉक्टर मदतीसाठी पुढे आले. यातील डॉक्टर तरुणाने तर अक्षरश: सुनीलकुमारच्या तोंडात तोंड घालून श्वास देण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर सर्वजण अक्षरश: ढसाढसा रडले अन तशातच आपले नाव न सांगता दोन्ही डॉक्टर तरुणतरुणी तेथून निघून गेले.
सुनीलकुमारला उडवून पसार झालेल्या इनोव्हाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून व इतर माहितीद्वारे या कारचा शोध घेतला जात असल्याची माहिती विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट सुपेकर यांनी दिली.

Web Title: Without helmet, lost organism