इमानचे चार आठवड्यांत ८० ते १०० किलो वजन घटणार

By Admin | Updated: February 14, 2017 03:59 IST2017-02-14T03:59:59+5:302017-02-14T03:59:59+5:30

जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय इमान अहमदचे चार आठवड्यांत ८० ते १०० किलो वजन घटणार

Within four weeks, we will lose 80 to 100 kg weight | इमानचे चार आठवड्यांत ८० ते १०० किलो वजन घटणार

इमानचे चार आठवड्यांत ८० ते १०० किलो वजन घटणार

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय इमान अहमदचे चार आठवड्यांत ८० ते १०० किलो वजन घटणार आहे. त्यानंतर इमान स्वत: बसून जेवू शकेल. त्यानंतर इमानला पुन्हा इजिप्तला पाठविण्यात येईल, अशी माहिती सैफी रुग्णालयाच्या इन्स्टिट्यूट आॅफ मिनिमल इनव्हेसिव्ह सर्जिकल सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आणि बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली.
चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी, पत्रकार परिषदेस इमान अहमद यांची बहीण शायमा अहमद, इमानवर उपचार करणारी १३ डॉक्टरांची चमू, इजिप्त वाणिज्य दूतावासाचे अधिकारी अहमद खलील उपस्थित होते. या वेळी डॉ. लकडावाला म्हणाले की, इमानची त्वचा कठोर झाल्याने पहिल्या टप्प्यात त्यावर उपचार करण्यात येणार आहेत. साधारणत: सामान्य निरोगी व्यक्तीचे बॉडी मास इंडेक्स हे २४ एवढे असते, मात्र इमानचे बॉडी मास इंडेक्स हे २५२ आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यात येईल. तसेच, इमानची त्वचा कठोर झाल्याने पहिल्या टप्प्यात त्यावर उपचार करण्यात येणार आहेत. सध्या रुग्णालयातील आठ महिला कर्मचारी इमानची दैनंदिन काळजी घेत आहेत. इमानच्या आहाराबाबत सांगताना डॉ. लकडावाला म्हणाले की, तिला सध्या लिक्विड सप्लिमेंट्स घेण्यास सांगितले आहेत. त्यात प्रोटिन्स आणि फायबर सप्लिमेंट्सचा सुरू आहे.
इमानच्या उपचारांसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉक्टरांच्या चमूमध्ये हुझैफा शेहाबी, डॉ. कमलेश बोहरा, डॉ. अबिझर मानकड, डॉ. अर्पणा भास्कर, डॉ. शेहला शेख, झोया ब्रार, डॉ. हेमल शहा, कार्लिन रेमेडिओस, डॉ. अरुण शहा, डॉ. सोनल शहा, डॉ. स्वाती कुडाळकर, डॉ. शर्मिला नायर, डॉ. राजेश शर्मा आणि डॉ. स्वाती संघवी यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
पिक्चर अभी बाकी है...
इमानला पुन्हा एकदा सामान्यांसारखे आयुष्य जगता यावे, हे अंतिम ध्येय आहे. तिने पुन्हा तिच्या पायावर उभे राहून फिरावे, स्वत:च्या हाताने जेवावे असे वाटते. मात्र यासाठी संघटनात्मक कार्य आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. इमानचे प्रकरण समजल्यानंतर जमेल की नाही अशी भीती होती, मात्र आता ती मुंबईत दाखल झाल्यानंतर खूप समाधानाची भावना आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने आव्हान सुरू झाले असून, ‘पिक्चर अभी बाकी है,’ असे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी सांगितले.
इमान सलमानची चाहती
इमान बॉलीवूडची चाहती आहे. बॉलीवूडचे सिनेमे आणि अभिनेते - अभिनेत्री तिला आवडतात. त्यातही ती सलमानची खूप चाहती आहे, त्याचे सिनेमे पाहायलाही तिला आवडतात. त्याचप्रमाणे शाहरूख आणि अमिताभ बच्चन यांचाही अभिनय तिला आवडतो. त्यामुळे आता हे सिनेमे इमानला पाहता यावेत, याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
११व्या वर्षी तिने शाळा सोडली
च्आपल्या वजनाच्या समस्येमुळे इमानने वयाच्या ११व्या वर्षी शाळा सोडली. गेल्या २५ वर्षांनंतर इमान पहिल्यांदाच घरातून बेरिएट्रीक सर्जरीसाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल झाली आहे. तिला बिछान्यावरून हलताही येत नाही.
च्आपल्या दैनंदिन क्रियेसाठी ती पूर्णपणे आपल्या आई आणि बहिणीवर अवलंबून असते. इमानचे लहानपणापासूनच वजन हे तिच्या वयाच्या तुलनेत अधिक होते. जन्माच्या वेळीच तिचे वजन जवळपास ५ किलोच्या आसपास होते.
च्स्ट्रोकमुळे इमानचा उजवा हात आणि पायाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. तसेच तिला टाईप-२ डायबेटिस आहे. शिवाय तिला उच्च रक्तदाबाचा त्रास असून, फुप्फुसांचाही त्रास आहे.

Web Title: Within four weeks, we will lose 80 to 100 kg weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.