साथ नात्यापलीकडची...

By Admin | Updated: August 7, 2016 02:22 IST2016-08-07T02:22:55+5:302016-08-07T02:22:55+5:30

कॉलेजमधले दिवस म्हणजे आयुष्यातील सोनेरी दिवस. शाळेच्या शिस्तीतून, युनिफॉर्ममधून सुटका होऊन एका नवीन आयुष्याची, करिअरची सुरुवात होते. यात साथ मिळते

Withdrawal ... | साथ नात्यापलीकडची...

साथ नात्यापलीकडची...

- पूजा दामले

कॉलेजमधले दिवस म्हणजे आयुष्यातील सोनेरी दिवस. शाळेच्या शिस्तीतून, युनिफॉर्ममधून सुटका होऊन एका नवीन आयुष्याची, करिअरची सुरुवात होते. यात साथ मिळते ती मैत्रीची, बोले तो अपने भिडू लोग की... कॉलेजमध्ये असताना रोजच्या रोज भेटणारी मित्रमंडळी नोकरी, व्यवसायाच्या रगाड्यात कुठे लांब जातात (अं... लांब म्हणजे नोकरीसाठी), ते कळतही नाही. काही दिवसातच याची सवय होते, पण तरीही आयुष्यातले त्यांचे स्थान बदलत नाही. ‘ती’ मैत्री तशीच राहते.
आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर नवीन लोक आयुष्यात येत असतात. त्यातून मित्र-परिवार वाढत जातो. प्रत्येक टप्प्यावर नवीन मित्र होणे, ही सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण प्रत्येक टप्प्यावर एकच मित्र टिकून राहणाऱ्याला ‘भाग्यवान’ असे म्हटले जाते. कॉलेजमध्ये असताना आॅगस्ट महिना सुरू झाल्यावर सर्वांनाच वेध लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’चे. आपली मैत्री सेलिब्रेट करण्यासाठी विविध प्लॅन असतात. म्हणजे बेस्ट फ्रेंडसाठी वेगळा जरा हटके ‘फ्रेंडशिप बँड’ आणि त्याचबरोबर एखादे छोटेसे गिफ्ट, एखादे चॉकलेट आणि मग बाकीच्या फ्रेंडसाठी टिपिकल कलर्सचे म्हणजे गुलाबी, लाल किंवा पांढऱ्या रंगाचे फ्रेंडशिप बँड. काही वेळा स्केचपेन, मार्करने कपड्यांवर, हातावर लिहिणे हा फंडापण हिट होता, पण अनेकदा कॉलेजमध्ये चालत नसल्यामुळे कॉलेज संपल्यावर असे प्रताप केले जायचे. आणि महिन्याची सुरुवात असल्यामुळे खिशात असणाऱ्या थोड्या-फार पैशातच (त्या वेळची सो कॉल्ड मोठी पार्टी) पार्टी व्हायची, पण आता हे सगळे दिवस आठवणीत उरले आहेत. शाळा, कॉलेजमध्ये झालेली मैत्री ही नात्यापलीकडची असते. यात कोणत्याच गोष्टींचा अडथळा नसतो. कारण त्यात कोणताही स्वार्थ, स्पर्धा नसते.
कॉलेजच्या मित्रांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, हे खरेय. मी आयटी फिल्डमध्ये नोकरी करतो. आयटी इंजिनीयरिंग करताना धम्माल फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केले आहेत. तेव्हाचे फोटो आता फ्रेंडशिपडेला फेसबुकवर टाकून मित्रांना टॅग करतो. त्यावरच्या कमेंट्स वाचतानाही धम्माल येते. आजच्या फ्रेंडशिप डेचा काही खास प्लॅन केलेला नाही, पण जमल्यास संध्याकाळी मित्रांना भेटीन. खर सांगायचे, तर आता मित्र भेटतात, तोच फ्रेंडशिप डे असतो, असे आयटीच्या खासगी कंपनीत जॉब करणाऱ्या समीप परब यांनी सांगितले. बी.फार्मच शिक्षण मुंबईतच झाले. लहानपणापासून मुंबईतच असल्यामुळे तिथे मोठे फ्रेंड सर्कल आहे, पण पुढच्या शिक्षणासाठी आता गेले दोन वर्षे अमेरिकेत आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईला आलो होतो. तेव्हा एक दिवस सगळा गु्रप भेटला होता, तोच माझा फ्रेंडशिप डे. अमेरिकेतही नवीन गु्रप झाला आहे. इथेही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करणार आहे, असे अनुराग गाडगीळने सांगितले.
एमबीबीएससाठी मी मॉस्कोला गेलो होतो. त्यामुळे मुंबईत आणि मॉस्को अशा दोन्ही ठिकाणी फ्रेंड सर्कल आहे. मॉस्कोला असणाऱ्या फ्रेंडस्शी वेगळे ट्युनिंग आहे. तिथे आम्ही सर्वच जण नवीन होतो. वेगवेगळ््या देशातून आलो होतो, पण तेव्हा त्यांचाच आधार होता. ते दिवस खूप एन्जॉय केले आहेत आणि तितका अभ्यासही केला आहे. सध्या अजून नवीन फ्रेंड्स मिळाले आहेत, त्यांच्याबरोबरच हा फ्रेंडशिप डे साजरा करेन, पण बाकीच्या फ्रेंड्सना आॅनलाइन विश करणार असल्याचे डॉ. अमेय कुंटे याने सांगितले.

 

Web Title: Withdrawal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.