शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ जण रिंगणात, भाजपने पंकजा मुंडेंना पुन्हा डावलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 09:29 IST

Legislative Council Election : राज्यसभेसाठी भाजपने दोन ऐवजी तिघांना रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक बिनविरोध होवू शकली नव्हती. त्याची पुनरावृत्ती भाजपने विधान परिषद निवडणुकीतही केली.

मुंबई : दोन दिवसांवर असलेल्या राज्यसभा निवडणुकीत जोरदार लढत होत असताना २० जून रोजी होणारी विधान परिषदेची निवडणुकही अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्ह आहेत. भाजपने बुधवारी पाच  जण रिंगणात उतरविले. शिवसेना व काँग्रेसने दोन-दोन उमेदवारांची नावे जाहीर केली. राष्ट्रवादीच्या दोघांची नावे रात्रीपर्यंत जाहीर झालेली नव्हती. १० जागांसाठी ११ जण रिंगणात असल्याने राज्यसभेप्रमाणेच रस्सीखेच बघायला मिळणार आहे. 

राज्यसभेसाठी भाजपने दोन ऐवजी तिघांना रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक बिनविरोध होवू शकली नव्हती. त्याची पुनरावृत्ती भाजपने विधान परिषद निवडणुकीतही केली. या निवडणुकीसाठीचे मतदान गुप्त असते. शिवसेनेने सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या दोघांनाही संधी नाकारत सचिन अहिर व नंदुरबारचे जुने शिवसैनिक आमशा पाडवी यांना संधी दिली. दोघांनीही बुधवारी अर्ज भरले. भाजपने पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा संधी नाकारली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले राम शिंदे यांचे पुनर्वसन केले.

प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय तसेच भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्ष उमा खापरे यांनाही उमेदवारी दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा उमेदवारी देताना प्रसाद लाड यांना पाचवे उमेदवार ठेवले आहे. काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या दोन मुंबईकर नेत्यांना मैदानात उतरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी मंत्री एकनाथ खडसे, अमरसिंह पंडित, शिवाजीराव गर्जे ही नावे चर्चेत आहेत. 

असे आहेत उमेदवारशिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी । भाजप  : प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे ।  काँग्रेस : चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदPankaja Mundeपंकजा मुंडे