पुण्यात बुधवारी विवेकी आक्रोश
By Admin | Updated: August 16, 2014 23:42 IST2014-08-16T23:42:24+5:302014-08-16T23:42:24+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती (अंनिस)च्या वतीने येत्या बुधवारी पुण्यात निषेध फेरी, सभा, रिंगण नाटय़ यांद्वारे शांततामय मार्गाने विवेकी आक्रोश केला जाणार आहे

पुण्यात बुधवारी विवेकी आक्रोश
>पुणो : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष उलटत चालले तरी तपास न लागल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समिती (अंनिस)च्या वतीने येत्या बुधवारी पुण्यात निषेध फेरी, सभा, रिंगण नाटय़ यांद्वारे शांततामय मार्गाने विवेकी आक्रोश केला जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेता नसिरुद्दीन शहा यांच्यासह विविध क्षेत्रंतील मान्यवर त्यात सहभागी होणार आहेत. हा दिवस निषेध दिन म्हणून पाळण्याचे ‘अंनिस’ने जाहीर केले आहे.
मागील वर्षी 2क् ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेला येत्या बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. ‘अंनिस’चे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर व कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी निषेध दिनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. या वेळी प्रधान सचिव मिलिंद देशमुख, नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे आदी उपस्थित होते. या दिवशी सकाळी 7.3क् वाजता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. दाभोलकर यांना चळवळीच्या गीतांनी स्वरांजली वाहिली जाईल. त्यानंतर 8 वाजता तेथून महापालिकेर्पयत निषेध फेरी काढण्यात येईल. त्या ठिकाणी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही फेरी एरंडवणो येथील मनोहर मंगल कार्यालयार्पयत येईल.
या ठिकाणी सकाळी 1क्.3क् वाजता जाहीर सभा होणार आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी असतील. सभेनंतर पुढील पाच तास महाराष्ट्र अंनिस लोक रंगमंचच्या वतीने रिंगण नाटय़ या माध्यमातून सांस्कृतिक अंगाने आपल्या विचारांचा सामूहिक आविष्कार सादर करतील. या वेळी ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शहा, डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू, सुमित्र भावे, अमृता सुभाष, उमेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकर उपस्थित राहतील. पुण्याप्रमाणोच राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शासनाला मारेकरी पकडायचेयत का?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला वर्ष झाले तरी अद्याप मारेकरी सापडलेले नाहीत. राज्य शासनाची बेगडी धर्मनिरपेक्षता आणि धर्माच्या नावावर अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे केंद्र शासन यांच्यामुळे विवेकी कार्यकत्र्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्यातील पोलीस आणि सीबीआयलाही मारेकरी सापडलेले नाहीत. त्यामुळे शासनाला खरेच मारेकरी पकडायचेत का? असा सवाल डॉ. हमीद दाभोलकर यांनी या वेळी उपस्थित केला. जोर्पयत मारेकरी सापडत नाहीत, तोर्पयत कार्यकर्ते सनदशीर मार्गाने निषेध करून चळवळीचा विचार अधिक सक्षमपणो मांडतील, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.