शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातून देण्यात आलेल्या कॅल्शीयमच्या गोळ्य़ांत आढळली तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 20:34 IST

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेला रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा देण्यात आल्या. मात्र या गोळ्य़ात तार आढळून आली आहे.

कल्याण - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेला रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा देण्यात आल्या. मात्र या गोळ्य़ात तार आढळून आली आहे. ही बाब वेळीस निदर्शनास आल्याने मनसेच्या पुढाकाराने महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध विभागाकडे याविषयीची तक्रार करण्यात आली आहे. 

    महापालिकेच्या रुग्णालयात योग्य प्रकारे उपचार मिळत नाही अशी बोंब नेहमीच उपचार घेण्यासाठी जाणा:या नागरीकांकडून केली जाते. काही औषधे ही बाजारात मिळत नाही. ती सरकरी रुग्णालयात मिळतात. कल्याण पूव्रेत राहणा:या रुपाली विशाल वाघचौरे या गरोदर आहे. त्या उपचारासाठी रुक्मीणीबाई रुग्णालयात गेल्या. त्यांना रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा दिल्या गेल्या. या गोळ्य़ा घरी आणून त्या घेणार तोच त्यांच्या निदर्शनास आले की, गोळ्य़ात तार आहे. त्यांना हे पाहून धक्काच बसला. त्यांचे पती हे मनसेचे शाखाध्यक्ष आहे. त्यांनी हा प्रकार मनसेचे कल्याण शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई यांना सांगितला. हा प्रकार ऐकून त्यांनाही धक्काच बसला. देसाई यांनी वाघचौरे याना घेऊन रुग्णालय गाठले. त्याठिकाणी विचारणा केली असता रुग्णालयाने त्यांच्याकडून या गोळ्य़ा दिलेल्या गेलेल्या नाहीत असे सांगून हात वरती केले. पिवळ्य़ा रंगाच्या गोळ्य़ा रुग्णालयातून दिल्या नाहीत तर रुग्णालयात मिळणा:या गोळया बाहेर विकल्या जातात का असा संशय व्यक्त केला जात आहे.रुग्णालयाकडून चूक मान्य केली गेली नसल्याने देसाई यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या  प्रकरणी गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल न करता एका राजकीय पक्षाने तक्रार दिल्याने केवळ अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे. देसाई यांनी या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हे उद्या कल्याणमध्ये येऊन वाघचौरे यांच्याकडे असलेल्या गोळ्य़ा तपासणीकराता नेणार आहे. त्यांच्या तपासणी अंती पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्य