वायरलेस विभागाच्या आठ जणांना बढती

By Admin | Updated: March 4, 2017 05:13 IST2017-03-04T05:13:19+5:302017-03-04T05:13:19+5:30

आठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक या पदोन्नतीवर विभागातर्गंत त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या

Wireless division promoted to eight | वायरलेस विभागाच्या आठ जणांना बढती

वायरलेस विभागाच्या आठ जणांना बढती


मुंबई : राज्य पोलीस दलातील बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) विभागातील आठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक या पदोन्नतीवर विभागातर्गंत त्यांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहे. तर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये कार्यरत असलेल्या २१ पोलीस निरीक्षकांच्या विशेष बाब म्हणून विविध ठिकाणी विनंतीवर बदल्या करण्यात आल्या आहेत.
वायरलेस विभागातील पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात कोठून- कोठे): दत्तात्रय पवार ( पुणे शहर- पुणे शहर), शिवाजी अलुरे (परभणी-नांदेड परिश्रेत्र), सुरेश पाटील (पुणे गट क्रं.१- नागपूर परिश्रेत्र), अनिल भोपे (पुणे- नागपूर पूर्व विभाग), अविनाश पांडे (गट क्रं.१ पुणे- अमरावती परिश्रेत्र), मुकुंद खैरनार (नाशिक परिश्रेत्र-महाराष्ट्र पोलीस अकादमी), हरिराम कामडी (नागपूर परिश्रत्र- नागपूर शहर), संजय चांदखेडे (मुंबई- औरंगाबाद परिश्रेत्र)
दरम्यान, जात पडताळणी विभागातील २१ पोलीस निरीक्षकांच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम-२२ न चे पोट कलम (२) नुसार पोलीस आस्थापना मंडळ क्रं.२ यांच्या अपवादात्मक प्रकरणातील अधिनियम -कलम-२२न(१)(क)(ड) व (इ) प्रदान अधिकाराचा वापर करुन विनंतीवर बदल्या करण्यात आल्या आहेत.
या सर्वांना तातडीने नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी घटकप्रमुखांना बजाविले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Wireless division promoted to eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.