हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार, गुरुनानक जयंतीलाही कामकाज सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 12:40 PM2018-11-01T12:40:01+5:302018-11-01T16:05:07+5:30

हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ जाहीर झाला आहे. हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे.

Winter session for two weeks, work on Guru Nanak Jayanti day will continue | हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार, गुरुनानक जयंतीलाही कामकाज सुरू राहणार

हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार, गुरुनानक जयंतीलाही कामकाज सुरू राहणार

Next

मुंबई- हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ जाहीर झाला आहे. हिवाळी अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. हिवाळी अधिवेशन 19 ते 30 नोव्हेंबर या कार्यकाळात घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गुरुनानक जयंतीच्या दिवशीही कामकाज सुरूच राहणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचा काळ वाढवण्याची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशन काळात मुंबईत आमदार निवास नसल्यास प्रत्येक सदस्याला एक लाख रुपये निवास भत्ता देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, इतक्या कमी पैशांत हॉटेल कसे मिळेल आणि कार्यकर्त्यांची कशी सोय करता येईल, याची चिंता सदस्यांना सतावते आहे. 

दुष्काळासह राज्यातील अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले असून, त्यावर विस्तृत चर्चेसाठी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान तीन आठवड्यांचा असायला हवा होता. मात्र ही चर्चा टाळण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचे केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्र विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यात दुष्काळाची स्थिती भयावह झाली आहे. दुष्काळ निवारणासाठी सरकारकडून पुरेशी तयारी झालेली नाही. मागील दोन दुष्काळांमध्ये हे सरकार दुष्काळी उपाययोजनांनी योग्य अंमलबजावणी करू शकले नाही, हे महाराष्ट्राने बघितले आहे. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांसह शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीत सरकारला आलेले अपयश, मराठा, मुस्लीम, धनगर आदी समाजांच्या आरक्षणाच्या मागणीबाबत सुरू असलेला वेळकाढूपणा, मुंबईचा विकास आराखडा व राज्यातील इतर नागरी समस्यांवर विरोधी पक्षांना सभागृहात चर्चा करायची आहे.

त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी किमान एका आठवड्याने वाढवून तीन आठवड्यांचा करावा, अशी मागणी आम्ही केली. मात्र जनतेचे प्रश्न मांडताना विरोधी पक्ष आक्रमक होऊन सरकार कोंडीत फसण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने जाणीवपूर्वक अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास नकार दिल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.

Web Title: Winter session for two weeks, work on Guru Nanak Jayanti day will continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.