शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दादांना कळलं ते तुम्हाला कळलं नाही; जयंत पाटलांचा खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 16:19 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचार करण्यासाठी परराज्यात गेले होते. यावरून जयंत पाटील यांना टोला लगावला आहे.

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय आणि उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकरी प्रश्नावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचार करण्यासाठी परराज्यात गेले होते. यावरूनही पाटील यांनी आपल्या खास शैलीत दोघांनाही टोला लगावला आहे.

"बळीराजा गारपीट आणि अवकाळी पावसाचा मारा सहन करत असताना सत्ताधारी मात्र शेजारच्या राज्याच्या निवडणुकीत प्रचारात व्यस्त होते. इतर राज्यांत प्रचार करण्यास आमची हरकत नाही. पण इथं आपला संसार फाटला आहे आणि आपले मंत्री दुसऱ्या राज्यात संसार जोडण्यासाठी जात आहेत. हे चित्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने बरं नाही. तुमचा तिकडं विजय झाला, याचा आम्हाला आनंद आहे. पण तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक इमेज असल्यामुळे तुम्हाला जाण्याची आवश्यकता नव्हती. तुम्हाला कोण विचारतो तिकडं?" असा खरपूस सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे.

"आपले मुख्यमंत्री प्रचारासाठी तिकडे गेले, एक उपमुख्यमंत्रीही गेले. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री गेले नाहीत," असं जयंत पाटील यांनी म्हणताच अजित पवारांनीही उत्तर दिलं. "मी तिकडे जाऊन काय दिवे लावणार होतो? जे आहे ते मोदींच्या नावावर आहे," असं अजित पवार म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढत जयंत पाटील म्हणाले की, "मी पण तेच म्हणतोय...जे दादांना कळलं ते तुम्हाला कळलं नाही."

"नितीन गडकरींच्या अनुपस्थितीत सरकारने घेतला तो निर्णय"

केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल करताना जयंत पाटील म्हणाले की, "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशभर फिरून सांगत आहेत की, आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करून कोट्यवधी रुपयांचं परकीय चलन वाचवत आहोत. मात्र हेच गडकरी बैठकीत नसताना नुकतंच केंद्र सरकारने उसापासून तयार करण्यात आलेले इथेनॉल न घेण्याचा निर्णय घेतला. तुम्हीच व्याजदर कमी करून कर्ज देत इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं होतं. मात्र आता साखरेचा भाव वाढतोय, हे लक्षात येताच इथेनॉल बंदी केली. सरकारने शेतकऱ्याला अडचणीत आणायचं ठरवलं आहे," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडलं आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस