शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन केवळ दहा दिवसांचे, ११ डिसेंबरला प्रारंभ : १३ विधेयके, ११ अध्यादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 04:20 IST

मुंबई : नागपूर येथे भरणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. रविवारची सुटी वगळता केवळ दहा दिवस कामकाज होणार असून या कालावधीत १३ विधेयके, ११ अध्यादेश आणि विधान परिषदेतील प्रलंबित विधेयके मान्यतेसाठी सभागृहात मांडण्यात येणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ...

मुंबई : नागपूर येथे भरणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. रविवारची सुटी वगळता केवळ दहा दिवस कामकाज होणार असून या कालावधीत १३ विधेयके, ११ अध्यादेश आणि विधान परिषदेतील प्रलंबित विधेयके मान्यतेसाठी सभागृहात मांडण्यात येणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली.हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने मंगळवारी विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. विधासभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना बापट म्हणाले, ११ ते २२ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन असेल आणि २१ तारखेला अंतिम आठवडा प्रस्ताव मांडणार येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती, त्याकडे लक्ष वेधले असता याबाबत निर्णय घेण्यासाठी २० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाईल, असे बापट यांनी सांगितले.सरकार चर्चेला तयारविरोधात असताना भाजपाने किमान महिनाभर हिवाळी अधिवेशन चालविण्याची भूमिका घेतली होती. याबाबत विचारले असता बापट म्हणाले की, आम्ही विरोधात असताना जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात चर्चा करत होतो, प्रश्न उपस्थित करत होतो. त्यामुळे कामकाज संपायचे नाही. त्यामुळे महिनाभर अधिवेशन चालविण्याची मागणी आम्ही त्या वेळी करत होतो. दुर्दैवाने आता तसे होत नाही. चर्चेपेक्षा गोंधळ करून कामकाज बंद पाडायचे काम विरोधक करत असल्याची टीका मंत्री बापट यांनी केली. सरकार सर्व प्रकारच्या चर्चेला तयार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार