शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

हिवाळा सरताना थंडीच्या लाटेने महाराष्ट्र गारठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 06:03 IST

धुळ्यात ३ अंश सेल्सिअस निचांकी तापमान

मुंबई : जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. तेथून येणाऱ्या थंड वाºयामुळे थंडीची लाट आली असून महाराष्ट्र पुन्हा गारठला आहे. विदर्भासह मराठवाडा आणि खान्देशात कडाक्याची थंडी आहे. बुधवारी राज्यात सर्वात कमी तापमान धुळे येथे ३ अंश सेल्सिअस तर त्यापाठोपाठ परभणी ४ तर नागपूर ४.६ अंशावर होते.बुधवारी विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट होती. येथील तापमानाचा पारा घसरल्याने दिवसादेखील चांगलाच गारठा जाणवत आहे. गुरुवारी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, तसे राज्यातील किमान तापमान असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.नागपूरसह विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमधील तापमान पारा चांगलाच खाली आला आहे. गेल्या ४ दिवसात नागपूरच्या तापमानात १५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त घट झाली आहे. गेल्या आठवड्यात २० अंशावर गेलेले उपराजधानीचे तापमान पुन्हा ४.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सकाळी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांचे आणि कामानिमित्त घराबाहेर पडणाºया चाकरमान्यांचे हाल होत आहेत.मराठवाड्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. परभणीतील तापमानाचा पारा ४ अंशापर्यंत घसरला आहे. दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण आणि थंड वारे वाहत असल्याने परभणीकरांना थंडीचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तापमानात घट सुरू झाली. मंगळवारी तापमान ७.५ अंशापर्यंत घसरले होते. बुधवारी पारा आणखी २.५ अंशाने खाली आला. मुंबईचे किमान तापमान १५ अंशावर घसरल्याने मुंबईकरांनाही रात्री पुन्हा सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे.ईशान्येत पाऊस; अरुणाचलमध्ये हिमवृष्टीपूर्व भारतातील अनेक राज्यांत पावसाची नोंद झाली आहे. अरुणाचल प्रदेशातील उंच ठिकाणी हिमवृष्टी झाली आहे.जम्मू-काश्मीर आणि तमिळनाडूत काही ठिकाणी हलका पाऊस झाला.झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा येथील किमान तापमानात दोन ते चार अंशाची घट झाली.बुधवारचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये : पुणे ८.२, अहमदनगर ६.७, जळगाव ६.४, मालेगाव ७.४, नाशिक ७.६, सांगली १३, सातारा ११.६, उस्मानाबाद १०.६, औरंगाबाद ७, परभणी ७.५, नांदेड ८, अकोला ७, अमरावती ८, बुलडाणा ८.२, चंद्रपूर ८.२, गोंदिया ६.५, नागपूर ४.६, वाशीम ८.२, वर्धा ७.४, यवतमाळ ७.४.

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्र