जिंकणारच...काँग्रेसच्या प्रचार पुस्तिकेचे प्रकाशन
By Admin | Updated: September 7, 2014 18:23 IST2014-09-07T18:11:57+5:302014-09-07T18:23:29+5:30
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून रविवारी काँग्रेसने जिंकणारच या प्रचार पुस्तिकेचे प्रकाशन केले.

जिंकणारच...काँग्रेसच्या प्रचार पुस्तिकेचे प्रकाशन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून रविवारी काँग्रेसने जिंकणारच या प्रचार पुस्तिकेचे प्रकाशन केले. भाजप सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत अशी टीकाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी केली.
काँग्रेसच्या दोन प्रचार पुस्तिकेचे रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. यातील पहिल्या पुस्तिकेचे नाव जिंकणारच असे आहे. तर दुस-या पुस्तिकेमध्ये नरेंद्र मोदींच्या कामकाजावर टीका करण्यात आली आहे. प्रकाशनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. मोदींनी नियोजन आयोग बरखास्त केले. आता नवीन संस्थेसाठी ट्विटरद्वारे जनतेची मतं मागवली जात आहेत. यासाठी किती वेळ लागले व तोपर्यंत नियोजन कसे केले जाईल असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला. वीजटंचाईसाठी मोदी सरकारच जबाबदार आहे अशी टीकाही त्यांनी केली.