शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

शब्दांना पंख ई-साहित्याचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 6:50 AM

परंपरेने चालत आलेले जे साहित्य आहे, त्याच प्रकारच्या परंपरेतले नवीन जाणिवेचे साहित्य आगामी वर्षात अपेक्षित आहे. जसे की, सध्या कविता, गझल, चारोळी हे प्रकार लोकप्रिय आहेत. या प्रकारात तरुणाई अधिक रमताना, अभिव्यक्त होताना दिसते. त्यामुळेच नवीन वर्षात फेसबुक पोस्ट, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप पर्यायाने ई-साहित्याचे नवे दालन अधिक व्यापक स्वरूपात खुले झालेले पाहायला मिळेल.

- श्रीपाल सबनीसपरंपरेने चालत आलेले जे साहित्य आहे, त्याच प्रकारच्या परंपरेतले नवीन जाणिवेचे साहित्य आगामी वर्षात अपेक्षित आहे. जसे की, सध्या कविता, गझल, चारोळी हे प्रकार लोकप्रिय आहेत. या प्रकारात तरुणाई अधिक रमताना, अभिव्यक्त होताना दिसते. त्यामुळेच नवीन वर्षात फेसबुक पोस्ट, टिष्ट्वटर, व्हॉट्सअ‍ॅप पर्यायाने ई-साहित्याचे नवे दालन अधिक व्यापक स्वरूपात खुले झालेले पाहायला मिळेल. विशेष उल्लेखनीय म्हणजे, परंपरागत चालत आलेल्या साहित्य प्रकारांइतकीच ताकद शब्दांना लाभलेल्या या नव्या ई-साहित्याच्याही पंखात आहे....हे शहाणपणाचे लक्षण नाहीसाहित्य आणि संमेलने यांचे अतूट, जिव्हाळ्याचे नाते आहे. साहित्य संमेलने ही सर्वार्थाने संस्कृतीचे उत्सव सोहळे आहेत, असे सोहळे झालेच पाहिजेत. लाखो लोक तेथे जमतात. ते वेडे नसतात. ते एकत्र येतात, ते केवळ साहित्य, संस्कृतीची देवाण-घेवाण करण्याच्या शुद्ध हेतूतून! त्यामुळे त्यांना वेडे म्हणणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.सोशल मीडियावर अभिव्यक्त होणारे मराठी साहित्य हा नवीन वर्षाचा नवा ट्रेंड होऊ पाहत आहे. हा ट्रेंड योग्य की अयोग्य, यावर चर्वितचर्वण करण्यापेक्षा तो अटळ, अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्यायला हवे. खंत एवढीच आहे की, तरुणाई ज्या पद्धतीने, ज्या शैलीमध्ये अभिव्यक्त होत आहे, ती शैली मात्र तितकीशी योग्य नाही. त्यात अनेक दोष आहेत. माणसातील झाकलेले पशुत्व आणि लपलेली विकृृती ही तरुणाईच्या आविष्कारातून सोशल मीडियातून व्यक्त होत आहे. अर्थात, सर्वच तरुणाईचे साहित्य हे अशा प्रकारचे विकृतीकडे झुकणारे आहे, असे म्हणता येणार नाही. विधायक प्रवृत्तीचे भाष्य, काव्य, विचार, संवाद, विकृतीवरील हल्लाबोल, टीका-टिप्पणीदेखील ई-साहित्याच्या माध्यमातून वाचायला मिळत आहे. फक्त या माध्यमाचा वापर सक्षमपणे होणे गरजेचे आहे.म्हणूनच सोशल मीडियाच्या नव्या माध्यमात संस्कृती शुद्धीकरणाची नवी चळवळ सुरू व्हायला हवी. ही चळवळ जास्तीत जास्त सत्यनिष्ठ असावी, मानवतावादाशी सुसंवाद साधणारी असावी. यासाठी तरुणाईची मने अधिक संस्कारक्षम करण्याची गरज आहे. कारण तरुण हे समाज माध्यमातील, समाज परिवर्तनातील, सशक्त समाज उभारणीतील महत्त्वाचा घटक आहेत. म्हणूनच आता ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिकांनी समाज जागरणाचा, समाज शुद्धीकरणाचा ध्येयवाद निष्ठेने जोपासत, तरुणाईला योग्य दिशा दाखवायला हवी. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. कारण आज तरुणाईतील निखळ संवाद कुठेतरी हरवत चालला आहे. प्रत्यक्षात संवादातूनच सुसंवाद घडतो. अनेकदा हाच संवाद विसंवादही घडवून आणतो, पण घाबरण्याची गरज नाही. कारण विसंवादाच्या पूर्वी आणि नंतर संवादच असतो. म्हणूनच संवाद हा समाजाचा, संस्कृतीचा गाभा असला पाहिजे, याची जाणीव तरुणाईला करून द्यायलाच हवी.ई-साहित्यात रमणाºया नवोदित साहित्यिकांना, तरुणाईला एवढेच सांगावेसे वाटते की, कुठल्याही परिस्थितीत सौहार्द, सहिष्णुता ही जपायलाच हवी. त्यासाठी लिखाणाची शैली चिंतनात्मक, मनोरंजनात्मक, प्रसंगी उपरोधिक असली तरी चालेल, परंतु ती हिंसक नसावी. तर माणूसपण जागवणारी, त्यांचे प्रबोधन करणारी, त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी हवी. कारण समाजातील सर्व पातळीवरील अंधार दूर करणे हेच साहित्यिकाचे आद्यकर्तव्य आहे. आजवरच्या साहित्यिकांनी आपापल्या परीने ते पार पाडले आहे. आता त्याची धुरा तरुणाईच्या रूपातील नवोदित साहित्यिकांवर आहे. त्यामुळेच आगामी कालखंडात निसर्गाचा आविष्कार, प्रेम, करुणा, वात्सल्य शब्दांच्या धाग्यात नजाकतीने गुंफताना क्रौर्य, द्वेष, सामाजिक विकृती, अन्याय, अत्याचाराविरुद्धची लढाईही प्रभावी लेखणीच्या माध्यमातूनच लढावी लागणार आहे. आजची तरुणाई, नवोदित साहित्यिक याचे भान ठेवून, सोशल मीडियाच्या अमर्याद आकाशात ई-साहित्याच्या पंखावर सजग, सशक्त शब्दांची उत्तुंग झेप निश्चितच घेतील, ही अपेक्षा आणि याच त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा!(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :marathiमराठी