वारा, सूर्यप्रकाशावर धावणार मेट्रो!
By Admin | Updated: May 25, 2014 00:05 IST2014-05-24T23:26:07+5:302014-05-25T00:05:27+5:30
लोणार तालुक्यातील विद्यार्थ्याने वारा व सूर्यकिरणांपासून तयार होणार्या उर्जेवर चालणार्या मेट्रो रेल्वेचा शोध लावला.

वारा, सूर्यप्रकाशावर धावणार मेट्रो!
महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे संशोधन चोरपांग्रा : लोणार तालुक्यातील मौजे चोरपांग्रा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने वारा व सूर्यकिरण यांच्यापासून तयार होणार्या उर्जेवर चालणार्या मेट्रो रेल्वेचा शोध लावला आहे. सदर उपकरणाची नोंदणी शासनाच्या बौद्धीक संपदा भवन मुंबई येथे करण्यात आली आहे. लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथील बद्री डहाळके हा दहावी व बारावी चांगल्या गुणांनी पास होऊन गर्व्हनमेंट पॉलीटेक्निक कॉलेज वाशिम येथे शिक्षण घेत आहे. या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट तयार करावा लागत असतो. सर्वाधिक खर्च होणारी उर्जा म्हणजे पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि विद्युत ही आहे. तेव्हा बद्री डहाळके याने या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून आधुनिक मेट्रो रेल्वेचे उपकरण तयार करण्यात यश मिळविले आहे. सदर आधुनिक मेट्रो रेल्वे ही वार्याच्या आणि सूर्याच्या किरणावर विद्युत निर्मिती करुन ती बॅटरीमध्ये साठविली जाते. त्यावर कंट्रोल पॅनलचे नियंत्रण ठेवत रेल्वे पूर्णपणे कार्य करते. या आधुनिक मेट्रो रेल्वे उपकरणाची नोंदणी शासनाच्या बौद्धीक संपदा भवन मुंबई येथे करण्यात आली आहे.