शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अकरावीच्या प्रवेशनिश्चितीसाठी हाेणार परीक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 06:53 IST

दहावीत सरसकट उत्तीर्णांमुळे पेच; शिक्षण विभागाकडून पर्यायांची चाचपणी   

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द झाल्याने एसएससी बोर्डाचे १६ लाख विद्यार्थी आणि इतर मंडळाचे अशा तब्बल १७ लाख विद्यार्थ्यांची अकरावीच्या प्रवेशासाठी झुंबड उडेल. त्यामुळे मूल्यमापनाचे निकष बदलणे किंवा अकरावीसाठी प्रवेश परीक्षा घेण्यासारख्या पर्यायांची शिक्षण विभाग चाचपणी करत असल्याचे समजते. आयटीआय, अकरावी, पॉलिटेक्निकच्या साडेआठ लाख जागा असल्याने प्रवेश मिळवण्यात विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे. 

काही वर्षे वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा राबवूनही अकरावीच्या हजाराे जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे अकरावी किंवा तंत्रशिक्षण पदविकेच्या प्रवेशाला अडचणी निर्माण होणार नाहीत. मात्र, नामवंत महाविद्यालयातील प्रवेशासाठीची चढाओढ आणखी तीव्र होईल, असे मत शिक्षण सुधारणा मोहीम (सिस्कॉम)च्या संचालिका वैशाली बाफना यांनी मांडले. 

गुणच देण्यात आले नसतील तर श्रेणीच्या साहाय्याने प्रवेशप्रक्रिया राबविताना गोंधळ उडू शकतो, अडचणी निर्माण होऊ शकतात. गुणांचे समानीकरण तर अवघडच असल्याचे त्यांनी सांगितले.

असे असू शकतात पर्याय nअंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनाचे निकष बघून राज्यातील मंडळाच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन उत्तीर्ण करून अकरावी प्रवेश गुणांच्या आधारे दिला जाऊ शकतो.nराज्य मंडळाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचाही पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो, जेणेकरून त्या गुणांच्या आधारे अकरावी प्रवेश दिला जाऊ शकेल.nनववी आणि दहावीचे संयुक्त मूल्यमापन करून अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल दिला जाऊ शकतो. याच निकालाच्या आधारावर अकरावीसह इतर प्रवेश प्रक्रियांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.

शैक्षणिक प्रगतीचे काय?राज्य मंडळ स्वायत्त असताना, त्याची व्याप्ती मोठी असताना इतर मंडळांच्या निर्णयामागे फरपटत जाण्यापेक्षा जूनपर्यंत वाट पाहून दहावीची परीक्षा घ्यायला हवी होती. विद्यार्थी मागील वर्षी अंतर्गत मूल्यमापनाने दहावीत आले, आता तसेच अकरावीत जाणार. त्यांची शैक्षणिक प्रगती किती झाली, हे कुठेच अधोरेखित होत नसल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मांडले.

टॅग्स :ssc examदहावीcorona virusकोरोना वायरस बातम्या