शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुढील ३० दिवसांत राज्यात पुन्हा मोठी राजकीय घडामोड घडणार?; अंजली दमानियांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 11:15 IST

ज्या लोकांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे अशा लोकांना देवेंद्र फडणवीस मोठे करतायेत अशी माझ्या मनात शंका आहे असंही दमानिया यांनी म्हटलं.

मुंबई - जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. सगळ्या निवडणुकांच्या आधी हे होईल. काँग्रेसही फुटेल. राम मंदिर सोहळ्यानंतर किंवा आधीही महाराष्ट्रात या घडामोडी घडतील असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. 

अंजली दमानिया म्हणाल्या की, येणाऱ्या काळात राज्यातील काँग्रेस पक्ष भाजपा फोडेल. त्यामुळे विरोधी पक्षच उरणार नाही. त्यामुळे आमच्या सारख्यांनाच विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल. लढावे लागेल. जो अमाप भ्रष्टाचार चालला आहे आणि भाजपा भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात ओढून घेतंय ते बघून दु:ख होते. त्यामुळे आम्हाला वेदना होतात. हीच भाजपा भ्रष्टाचाराविरोधात लढायची का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. 

तसेच ज्या लोकांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे अशा लोकांना देवेंद्र फडणवीस मोठे करतायेत अशी माझ्या मनात शंका आहे. जरांगेबद्दल म्हटलं जाते की ते एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून करतात तसं मीदेखील ऐकलं.परंतु मला तसं वाटत नाही. आज लढायचे झाले, तर कुणाविरोधातही लढले तरी त्यामागे बनावट कट रचला जातो. पूर्वी मी खडसेंविरोधात, सिंचन घोटाळ्याविरोधात लढले तेव्हा मी फडणवीसांसाठी लढतेय असं लोक म्हणायचे. पण आज मी फडणवीसांविरोधात लढले तर पुन्हा लोक तर्कवितर्क लावतात असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

मनोज जरांगेंचं कौतुक अन् दिला सल्लादरम्यान, जो कोणी लढतो त्यांना अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. पण जरांगेंनी इतका मोठा लढा उभा केलाय त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. राजकीय वर्तुळात जी चर्चा होते तीच मी ऐकली आहे. मराठा आरक्षणासाठी ती व्यक्ती लढा देत असेल तर त्याचे कौतुक करायला हवे. एवढा मोठा लढा उभा करणे ही खाऊची गोष्ट नक्कीच नाही. परंतु जरांगे पाटलांवर ज्याप्रकारे पुष्पवृष्टी केली जाते. अडीचेशे जेसीबी लावून फुलं उधळली जातात ते जरांगेनीही स्वत:हून थांबवायला हवे. आपण आपल्या लढ्याला तत्वे ठेवली तर खरं कोण आणि खोटं कोण हे लोकांनाही कळते असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाBJPभाजपाcongressकाँग्रेस