ST Shivshahi Bus News: राज्य परिवहन महामंडळाने दिमाखात शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेत आणली होती. शिवशाही बसने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी जोरदार टक्कर दिली होती. वाहतुकीच्या स्पर्धेत शिवशाही अग्रगण्य ठरत होती. परंतु, आता एसटीचा मोठा ब्रॅण्ड असलेली शिवशाही हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील 'शिवशाही' बसबाबत राज्य सरकार एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत असल्याचे म्हटले जात आहे. सततचे बिघाड आणि प्रवाशांचा घटता प्रतिसाद पाहता, महामंडळाच्या मालकीच्या ४५३ शिवशाही बस आता निमआराम आणि साध्या बसमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. एकेकाळी प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली शिवशाही आता नव्या साध्या अवतारात रस्त्यावर धावताना दिसेल, असे सांगितले जात आहे.
शिवशाही बसकडे प्रवासी पाठ फिरवू लागल्याचे केले कबूल
एसटी महामंडळाकडे स्वमालकीच्या एकूण ६८८ शिवशाही बस आहेत. त्यापैकी ४५३ बसेस सध्या सुस्थितीत असून धावत आहेत. मात्र, या बसचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, वातानुकूलित यंत्रणेतील तक्रारींमुळे या बसचे रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवशाही बसमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवासी आता या बसकडे पाठ फिरवू लागले होते, हे शासनानेही कबूल केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बस दाखल होत आहेत. गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी ३X२ आसन रचनेच्या तब्बल ५५ आसनी अत्याधुनिक बसची खरेदी करण्यात आली आहे. या नव्या बसला 'हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ' यांचे नाव देण्यात आले आहे.
Web Summary : Maharashtra's Shivshahi buses, once a popular choice, are being phased out due to frequent breakdowns and declining ridership. 453 buses will be converted into simpler models. New 55-seater buses named 'Rajmata Jijau' will soon join the fleet.
Web Summary : महाराष्ट्र की लोकप्रिय शिवशाही बसें अब बंद होंगी क्योंकि वे बार-बार खराब हो रही हैं और यात्री कम हो रहे हैं। 453 बसों को सरल मॉडल में बदला जाएगा। 'राजमाता जिजाऊ' नाम की नई 55-सीटर बसें जल्दी ही सेवा में शामिल होंगी।