शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

मोदींना पंतप्रधान करण्यासाठी बारामतीतून खासदार पाठवणार, गोपिचंद पडळकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 22:13 IST

Gopichand Padalkar: अजित पवार हे महायुतीत सहभागी झाल्याने बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासमोरील आव्हान वाढलं आहेत. त्यातच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत सनसनाटी दावा केला आहे. 

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. त्यातच गतवर्षी जुलै महिन्यात अजित पवार हे समर्थक आमदारांसह महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याने शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच भाजपाच्या मिशन ४५+ लाही बळ मिळालं आहे. अशा परिस्थितीत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यासमोरील आव्हान वाढलं आहेत. त्यातच भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत सनसनाटी दावा केला आहे. 

गोपिचंद पडळकर म्हणाले की, भाजपा निवडणुका आल्यानंतर काम करत नाही. भाजपा हा दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असतो. निवडणूक कोण लढवणार हा विषय माझ्या हातात नाही. त्याबाबत आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. परंतु नरेंद्र मोदी ज्या दिवशी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्या दिवशी बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार हा मोदींच्या बाजूने बोट वर करताना दिसेल. आता तो खासदार कोण असेल, ते आमचे वरिष्ठ ठरवतील. 

शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ सर करण्यासाठी भाजपाकडून २०१४ पासून प्रयत्न सुरू आहेत. २०१४ मध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी टक्कर दिली होती. तर २०१९ मध्ये भाजपाने येथे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कांचन कूल यांमा उमेदवारी दिली होती. सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवला आहे. मात्र अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलल्याने या वेळच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर कडवं आव्हान असेल. 

टॅग्स :baramati-pcबारामतीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार