शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भस्म लावले असते तर प्रमोद महाजन वाचले असते - चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2019 20:28 IST

औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात.  औरंगाबादमध्ये आयोजित आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा केला आहे.

ठळक मुद्देचंद्रकांत खैरे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत रुग्णांच्या नाडीवर हात ठेऊन जप केला तर रुग्ण बरा होतो.भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा

औरंगाबाद : औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. औरंगाबादमध्ये आयोजित आरोग्य मेळाव्यात चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याबद्दल अजब दावा केला आहे.

प्रमोद महाजन अत्यवस्थ असताना आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. नाहीतर, प्रमोद महाजन यांच्या नाडीवर भस्म लावून जप करून त्यांना वाचविले असते, असा खळबळजनक आणि हास्यास्पद दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. प्रमोदजी जेव्हा रूग्णालयात होते तेव्हा मला गोपीनाथ मुंडे म्हटले होते तू काहीतरी कर. सिद्धिविनायक मंदिरात जा काहीतरी फूल वगैरे घेऊन ये. माझ्याकडे एक पुडी होती. तो अंबाबाईचा अंगारा होता, तो मी राहुलकडे दिला. राहुलला सांगितलं प्रमोदजींच्या उशीखाली ही पुडी ठेव. प्रमोद महाजन यांच्या उशीखाली ती पुडी ठेवल्यावर मी तिथे गेलो होतो मी जप केला. पण मला त्यावेळी प्रमोद महाजनांना हात लावता आला नाही. तिथे जाण्याची कुणाला संमतीच नव्हती. ती मिळाली असती तर मी महाजनांना वाचवू शकलो असतो असा दावा खैरे यांनी केला आहे. प्रमोदजी बारा दिवस जगले, त्यानंतर शांत झाले. त्याच एका कामात मला अपयश आलं नाहीतर मला आत्तापर्यंत अशा प्रयोगांमध्ये एकदाही अपयश आलेलं नाही. जशी डॉक्टरांची शक्ती असते तशी आमची सदिच्छा असते. मी अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत नाही, खरोखरच सांगतो आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.  

दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी हा दावा कोणत्या निवडणुकीच्या प्रचार सभेत केला नाही. तर चक्क राज्य सरकारच्या आरोग्य मेळाव्यात केला आहे. या मेळाव्यात अनेक डॉक्टर उपस्थित होते. त्यांच्यासमोर चंद्रकांत खैरे यांनी असे बेजबाबदार विधान केले आहे.

 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद