शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार?; संजय राऊतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 19:50 IST

आदित्य ठाकरेंचे नेतृत्व लोकांना कमालीचे आवडू लागले आहेत असं कौतुक संजय राऊतांनी केले.

मुंबई - शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष दिले आहेत. त्यात आदित्य ठाकरे प्रामुख्याने पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे पुढील नेतृत्व आदित्य ठाकरेंकडे असेल, पण उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे सक्रीय राजकारणात उतरणार का? या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. 

संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे १५-२० वर्ष राजकारणात सक्रीय आहेत. त्यांना राजकारणात एक कालखंड लोटला. आमदार, मंत्री, पक्षाचे नेते म्हणून ते काम करतायेत. रश्मीवहिनी महिलांच्या कामासंदर्भात सक्रीय असतात. जिथे जिथे महिलांवर अन्याय होतो त्या महिला येऊन भेटतात. त्यात त्या रश्मीवहिनी सहभागी होतात. ठाण्यात आमच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदेवर हल्ला झाला, तिथे त्या धावून गेल्या, रात्रभर तिथे पदाधिकाऱ्यांशी संपर्कात होत्या, पण त्या विधिमंडळ राजकारणात येतील असं मला वाटत नाही असं त्यांनी सांगितले. पाहा संजय राऊतांची पूर्ण मुलाखत  

तर आदित्य ठाकरे निर्भीड आहेत. आजोबा बाळासाहेबांचे गुण त्यांच्यात आहेत. संकटकाळात ज्याप्रकारे नेतृत्व उभे केले आहे. लोकं त्यांच्यावर फिदा आहेत. आम्ही आता सिनिअर सिजिझन झालोय आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करतील हे लोकांनी स्वीकारलंय, शिवसेना तरुणांची ताकद आहे. आदित्य ठाकरे ज्याप्रकारे काम करतायेत ते नुसते पक्षाचे काम करताय असं नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. लोकं त्यांचे बोलणे स्वीकारतायेत. आदित्य ठाकरेंचे नेतृत्व लोकांना कमालीचे आवडू लागले आहेत असं कौतुक संजय राऊतांनी केले. लोकमत ऑनलाईननं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

उद्धव ठाकरेंचे एक मोठे प्रस्थराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत, काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे आणि महाराष्ट्रात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आपल्याला हुकुमशाहीविरोधात लढले पाहिजे हे तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घेतला आहे. ही भूमिका सगळ्यांनी एकत्र बसून घेतलीय. उद्धव ठाकरे यांचे प्रस्थ आहे. आमच्याकडून शिवसेना काढून घेतली, चिन्ह काढले तरी आमचे प्रस्थ आहे. आता आमच्याबद्दल राष्ट्रवादीत काय चर्चा होते हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. महाविकास आघाडी अखंड राहील हेच मी बोलतोय असंही राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरे