शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्फाेटके कारप्रकरण; पोलीस आयुक्त परमबीर सिंग राहणार की जाणार? गृहविभागासह वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 03:26 IST

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यामागे वाझेंसाेबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडेही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

जमीर काझी - मुंबई: सचिन वाझे यांच्या अटकेचे पडसाद राज्याच्या राजकारणाबरोबरच पोलीस वर्तुळात मोठ्या प्रमाणात उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणामुळे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अन्यत्र बदली हाेईल, अशी चर्चा गृह विभाग व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्याबाबत महाविकास आघाडीचे नेते लवकरच निर्णय घेणार आहेत, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत एकमत झाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  (Will Police Commissioner Parambir Singh stay or go? Discussions among senior officials with the Home Department)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यामागे वाझेंसाेबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडेही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. याची नैतिक जबाबदारी म्हणून आयुक्त परमबीर सिंग यांना बाजूला करावे, असे मत महाविकास आघाडीचे नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांतून व्यक्त केले जात आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला थोपविण्यासाठी हा निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जाते.

त्यामुळे नव्या आयुक्तांच्या नियुक्तीबद्दल अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

गेल्या सव्वा वर्षापासून पाेलीस आयुक्तपदी कार्यरत असलेले परमबीर सिंग यांनी कोरोना काळातील परिस्थिती, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई अशी अनेक प्रकरणे व्यवस्थित हाताळल्याने राज्य सरकारची त्यांच्यावर मर्जी होती. मात्र, स्फोटक कार प्रकरणात सुरू असलेल्या गुंतागुंतीमुळे अखेर आयुक्तांना पदावरुन हटविले जाईल, अशी चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आहे.

‘एनआयए’चे संचालक मुंबईतस्फोटक कारच्या गुन्ह्यात वाझेंशिवाय  त्यांना पाठीशी घालणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एनआयए चौकशी करणार आहे. त्यासाठी संचालक वाय. सी. मोदी हे सोमवारी मुंबईत आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना चाैकशीसाठी बाेलावण्यात येणार असल्याचे समजते. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगPoliceपोलिसMumbaiमुंबईsachin Vazeसचिन वाझे