महाराष्ट्रात परतणार नाही- गडकरी
By Admin | Updated: October 16, 2014 00:54 IST2014-10-16T00:54:12+5:302014-10-16T00:54:12+5:30
मतदानानंतरचे सर्व्हे राज्यात भाजपचे सरकार येणार असल्यावर शिक्कामोर्तब करीत आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री कोण असावा, याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. आपण या शर्यतीत नाही.

महाराष्ट्रात परतणार नाही- गडकरी
राज्यात बहुमताचे सरकार : फडणवीस, तावडे, खडसे, मुनगंटीवारांची नावे
नागपूर : मतदानानंतरचे सर्व्हे राज्यात भाजपचे सरकार येणार असल्यावर शिक्कामोर्तब करीत आहेत. भाजपकडून मुख्यमंत्री कोण असावा, याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईल. आपण या शर्यतीत नाही. आधी माझी दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती, पण आता दिल्लीत रमलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परतणार नाही, असे भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री यांनी स्पष्ट केले.
गडकरी म्हणाले, दिल्लीत माझ्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. गंगा सफाई करायची आहे. तेच उद्दिष्ट आहे. राज्यात अनेक सक्षम नेते असल्याचे सांगत फडणवीस, तावडे, खडसे, मुनगंटीवार या चार नेत्यांची नावे त्यांनी घेतली. या चार पैकीच कुणी मुख्यमंत्री होईल, असे संकेत गडकरी यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महागाई कमी होत आहे. राज्यात भाजपचा विजयाचा शंखनाद होणार असून या विजयाचे श्रेय राज्य व केंद्रातील पक्ष नेतृत्वासह कार्यकर्त्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)