निवडणूक लढणार नाही - राज ठाक रे यांचा यू टर्न !
By Admin | Updated: August 25, 2014 01:21 IST2014-08-25T01:21:01+5:302014-08-25T01:21:01+5:30
ठाकरे कुटुंबात यापूर्वी कुणीही निवडणूक लढवलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा आमचा मतदारसंघ आहे, असे सांगत स्वत: विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचा खुलासा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी

निवडणूक लढणार नाही - राज ठाक रे यांचा यू टर्न !
कुटुंबात कुणीही निवडणूक लढवलेली नाही : मोदी बहिष्कारावर मुख्यमंत्र्यांचे समर्थन
नागपूर : ठाकरे कुटुंबात यापूर्वी कुणीही निवडणूक लढवलेली नाही. संपूर्ण महाराष्ट्र हा आमचा मतदारसंघ आहे, असे सांगत स्वत: विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचा खुलासा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी नागपुरात केला. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर मुंबईत मनसेच्या मेळाव्यात भाषण करताना आपण स्वत: विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे राज यांनी जाहीर केल्यानंतर ते कोठून लढणार याबद्दल चर्चा सुरू झाली होती. त्याला त्यांनीच पूर्णविराम दिला.
राज म्हणाले, निवडणूक लढविण्याचा विचार मी केला होता. तशी घोषणाही मी केली होती. परंतु त्यानंतर बराच विचार केला. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, काका, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही निवडणूक लढले नाहीत. आपणही एका मतदारसंघापुरते मर्यादित राहिलेलो नाही, असे सांगत त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत यू टर्न घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले. काँग्रेसचा पंतप्रधान असताना भाजपाशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांचा अवमान झाला असता तर चालले असते का, असा सवाल राज यांनी केला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला पाहिजे, असेही राज म्हणाले. विदर्भातील इच्छूक उमेदवारांच्या रविवारी नागपुरात मुलाखती घेतल्यानंतर विदर्भात ४०-४५ जागा मनसे लढविणार असल्याचे राज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)
ं काय म्हणाले राज ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आठ दिवसात जाहीर करणार. निवडणूक आयोगाने सणासुदीच्या दिवसांत निवडणुका लावू नयेत पण तारखा लवकर जाहीर कराव्यात. निवडणूक आयोग तारखांचा सस्पेन्स कशाला ठेवतो?