भविष्यात निवडणूक लढविणार नाही - जैन

By Admin | Updated: May 8, 2017 04:02 IST2017-05-08T04:02:08+5:302017-05-08T04:02:08+5:30

जळगावकरांनी मला तब्बल ९ वेळा आमदार करीत भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळे भविष्यात निवडणूक लढणार नसल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन

Will not contest election in future - Jain | भविष्यात निवडणूक लढविणार नाही - जैन

भविष्यात निवडणूक लढविणार नाही - जैन

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावकरांनी मला तब्बल ९ वेळा आमदार करीत भरपूर प्रेम दिले आहे. त्यामुळे भविष्यात निवडणूक लढणार नसल्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी रविवारी येथे सांगितले.
लायन्स क्लब सेंट्रल तर्फे बहिणाबाई उद्यानातील सुशोभीकरण व नूतनीकरण कामांचा लोकार्पण सोहळा झाला. सुरेशदादा म्हणाले की, जळगाव शहर अधिक सुंदर, स्वच्छ व हिरवेगार कसे करता येईल यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. शासनाकडून येणाऱ्या निधीचा वापर शहरातील विकासकामांसाठी नियोजनबद्धरित्या झाला पाहिजे. आमदार सुरेश भोळे यांना भीती बाळगण्याची गरज नाही. कारण भविष्यात मी निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावर एकच हंशा पिकला.

Web Title: Will not contest election in future - Jain