शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 20:37 IST

Sharad Pawar Reaction On Shaktipeeth Mahamarg: हा प्रकल्प काय आहे? त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar Reaction On Shaktipeeth Mahamarg: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच आता कोल्हापूरसह अनेक ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला जात आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. नेतेही याला तीव्रपणे विरोध दर्शवत आहेत. यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत एक सूचक विधान केले आहे. 

शक्तिपीठ महामार्गाबाबत काही आक्षेप असतील, तर चर्चेतून सोडवू. परंतु, राजकारणासाठी विरोध केला तर याद राखा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या शरद पवार यांनी याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच मंत्रिमंडळातील काही मंत्री शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आहेत, असेही सांगितले. यावेळी शरद पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही

देवेंद्र फडणवीसच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे. आता आमचे कसे व्हायचे, असा खोचक टोला लगावताना, शक्तिपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. हा प्रकल्प काय आहे? हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन. त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्यांची मते जाणून घेईन. त्या भागातील लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलत आहेत, त्यांचा आग्रह समजून घ्यावा लागेल. मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकल्पासाठी ८६,३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. सध्या कोल्हापूर वगळता ११ जिल्ह्यांतील ३०९ गावांत मोजणी सुरू आहे. ऑगस्टपर्यंत मोजणी पूर्ण करून डिसेंबरअखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गामुळे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधदुर्ग हे १२ जिल्हे जोडले जातील.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गNCPराष्ट्रवादी काँग्रेस