शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

NCP ला धक्का! माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद आणि आमदारकीही रद्द होणार?; जाणून घ्या कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:56 IST

कोर्टाने २ वर्षापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपदही धोक्यात आलं आहे.

मुंबई - राज्याचे कृषीमंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारमाणिकराव कोकाटे यांना एका खटल्यात नाशिक जिल्हा व सत्र न्यायलयाने दोन वर्षांचा करावास, ५०हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली. १९९५ साली कागदपत्रामध्ये फेरफार करून फसवणूक केल्याचा आरोपाखाली माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंवर गुन्हा दाखल होता. त्या प्रकरणी कोर्टाने निकाल सुनावला आहे.

फसवणूक प्रकरणाची अंतिम सुनावणी कोर्टात आज सुरू होती. त्यानंतर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने या खटल्यात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोषी ठरवले. माजी मंत्री तुकाराम दिघोंळेंनी कोकाटे बंधूंविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. या खटल्यावर अखेर कोर्टाने निकाल दिला आहे. आता कोर्टाने २ वर्षापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्याने माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपदही धोक्यात आलं आहे.

२ वर्ष किंवा अधिक शिक्षा झाल्यास पद रद्द

गुन्हेगारांना राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयानुसार जर एखाद्या नेत्याला २ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा कोर्टाने सुनावली तर त्याचं सदस्यता तात्काळ रद्द होईल. आमदार-खासदारांना कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवल्यापासून त्यांची आमदारकी अथवा खासदारकी पद रद्द केले जाईल. २ वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला होता. या आदेशाने फौजदारी प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या खासदार आणि आमदारांना उच्च न्यायालयात अपील प्रलंबित होईपर्यंत अपात्र ठरवण्यापासून संरक्षण देणारी तरतूद रद्द केली होती. 

दरम्यान, मागील टर्ममध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना २ वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. २३ मार्च २०२३ ला राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व पद काढण्यात आले. भारतीय कायदा १०२(१) आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. या कायद्यानुसार कुठलाही लोकप्रतिनिधी जर एखाद्या प्रकरणात दोषी आढळला आणि त्याला २ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्यांचे सभागृहाचे सदस्यत्वपद रद्द होईल. त्याबाबत अंतिम निर्णय सभागृहाच्या अध्यक्ष किंवा सभापतींचा असेल.  

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMLAआमदार