व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार
By Admin | Updated: January 13, 2015 03:04 IST2015-01-13T03:04:27+5:302015-01-13T03:04:27+5:30
युवा पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आगामी वर्षात राज्यातील विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियान

व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार
जालना : युवा पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आगामी वर्षात राज्यातील विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे दिली.
राज्यातील सहा युवक-युवतींना युवा दिनानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, प्राचार्य आर.जे. गायकवाड आदी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या, सत्तेपेक्षा विरोधी पक्षात काम करताना कामे वाढतात. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान सुरू केले. या उपक्रमाची आम्हीही प्रशंसा केली. कचरा गोळा करून पुढे करायचे काय? त्यावर काय प्रक्रिया करायची, हे स्पष्ट झालेले नाही, असे सुळे यांनी सांगितले. ग्रामीण भागात बालविवाह रोखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणा-या शेवंता बाजीराव राठोड हिची प्रतिष्ठानने ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली. (प्रतिनिधी)