शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

कोल्हापूरचे दादा आता पुण्याचे पालकमंत्री होणार का? चंद्रकांत पाटलांनी दिले 'खतरनाक' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 18:19 IST

अंतर्गत विरोधामुळे हे सरकार पडेल. मग एक पोकळी निर्माण होईल आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही विचार करू. असे आम्ही म्हणत होतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात हिंदुत्व विरोधी, विकास विरोधी, विकास कामे ठप्प करणारे, गुन्हेगारांना पाठीशी घालणारे, कुठलीही चूक नसताना जेलमध्ये घालणारे असे एक महाभयानक सरकार बऱ्याच वर्षांपूर्वी कृत्रिम युती करून आले होते. ते देवेंद्र आणि एकनाथ या दोघांच्या अथक प्रयत्नामुळे गेले. महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा टीआरपी प्रचंड वाढला होता. कार्यकर्ताच नाही तर सर्वसामान्य माणूस या बातमीची जोडला गेला होता, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. 

बंडखोर हा शब्दच चुकीचा आहे. हे सरकार भाजप - शिवसेना युतीचे आहे. मुख्यमंत्री पदावरून कुठलीही नाराजी भाजपमध्ये नाही. हिंदुत्वाचं रक्षण करणारे, विकासाला चालना देणारे हे सरकार असल्याने भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता प्रत्येक कार्यकर्ता खुश आहे, असे म्हणत पाटलांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप माहिती नसल्याचे सांगितले. 

लोकशाहीमध्ये बहुमत चालतं, आकडे चालतात. हा आकडा ज्यांच्याकडे आहे तो खरा सरकार मधला पक्ष. पण यावर टिप्पणी करण्यासाठी मी काही घटनातज्ञ नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्याला जे दिसतं ते म्हणजे आता शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि भाजप शिवसेना हे सरकार आलेलं आहे, असे पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केली होती, तेव्हा भाजपकडून आमचा याच्याशी कोणताही संबंध नाही, असं सांगण्यात आलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणालेत, जर कोणी एखादा प्रयत्न करत असेल आणि त्यांना आमची मदत लागली तर आम्ही करायची की नाही मदत? त्यामुळे आमचा तेव्हा आमचा काहीही संबंध नव्हता. आम्ही वारंवार असं मांडत होतो की अंतर्गत विरोधामुळे हे सरकार पडेल. मग एक पोकळी निर्माण होईल आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही विचार करू. असे आम्ही म्हणत होतो, असेही स्पष्टीकरण पाटलांनी दिले. 

पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रभाग रचना बदलली जाणार आहे असा आरोप केला जातोय. यावर पाटील म्हणाले, मी काही असं म्हणणार नाही. कारण आधीच्या सरकारने प्रत्येक नियम पायदळी तुडवून जे केलं, असं काही हे सरकार करणार नाही. नियमात काय बसतं हे मला माहीत नाही, असे ते म्हणाले. कोल्हापूरचे दादा आता पुण्याचे पालकमंत्री होतील का? यावर पाटलांनी बगल देत, माहित नाही तुम्हाला कळलं तर मला सांगा, असे उत्तर दिले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे