शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:32 IST

राज्यातील काही पालिका हद्दीत मास-मटण विक्रीवर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Maharashtra Politics : आज देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून १९४७ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत भारत देश बदलत गेला. भारताने सर्वच क्षेत्रात खूप प्रगती केली. पण यंदाच्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात एक विषय गाजतोय. हा विषय लोकांच्या आहाराशी संबंधित आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील काही पालिका हद्दीत आज मांस-मटणाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गोकुळाष्टमीचा पवित्र सण असल्याने दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी अशा संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यावरून वाद सुरु आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर यावर भाजपाकडून १९८८च्या आदेशाचा दाखल देण्यात आला असून आव्हाडांनाच प्रश्न विचारण्यात आला आहे.

भाजपाचा पलटवार

"जितेंद्र आव्हाड हे सध्या नौटंकीतही पारंगत झाले आहेत. कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत अधिकार आहे. पण हा अधिकार इतरांच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्याचा परवाना नसतो. लक्षात ठेवा, कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा आजचा नाही. हा निर्णय १९८८मध्ये शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाला होता. मग आज जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचा निषेध करणार आहेत का?" असा खरमरीत सवाल भाजपाचे नवनाथ बन यांनी विचारला.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि स्वतः जितेंद्र आव्हाड मंत्री असताना देखील १५ ऑगस्ट, कृष्णजन्माष्टमीसह अनेक धार्मिक दिवशी कत्तलखाने बंदच होते. तेव्हा त्यांना या सगळ्याची आठवण नव्हती का? आज पवित्र कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी मटण पार्टीचे आयोजन करून त्यांनी हिंदू समाजाच्या भावनांचा अपमान केला आहे. ही केवळ असंवेदनशीलता नाही, तर जाणीवपूर्वक केलेली धार्मिक भावनांची पायमल्ली आहे," असा आरोप त्यांनी केला.

"मी जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा तीव्र निषेध करतो आणि त्यांना सांगतो की, धार्मिक सण-उत्सव हा अपमानाचा नव्हे, तर आदराचा विषय आहे. हिंदूंच्या श्रद्धेला धक्का देणारे प्रयोग थांबवा," असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारBJPभाजपा