अकरावीची पहिली यादी मध्यरात्री जाहीर होणार?

By Admin | Updated: July 10, 2017 19:47 IST2017-07-10T19:47:11+5:302017-07-10T19:47:11+5:30

अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. संकेतस्थळावर डेटा अपलोड झाला नसल्यामुळे अकरावी प्रवेशाची पहिली यादी अजूनही जाहीर झालेली नाही.

Will the first list of eleven be announced at midnight? | अकरावीची पहिली यादी मध्यरात्री जाहीर होणार?

अकरावीची पहिली यादी मध्यरात्री जाहीर होणार?

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. संकेतस्थळावर डेटा अपलोड झाला नसल्यामुळे अकरावी प्रवेशाची पहिली यादी अजूनही जाहीर झालेली नाही. पहिली यादी जाहीर व्हायला रात्रीचे ११ ते १२ वाजू शकतात, अशी माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. 
 
सोमवारी सायंकाळी ५ वाजता मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. पण कंपनीने दुपारपासून काम सुरु केले तरी वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. यंदा जास्त गुण मिळल्याने पहिल्या यादीचा कट ऑफ किती असणार याकडे सर्वंचे लक्ष लागून आहे. पण अजूनही यादीच जाहीर न झाल्याने आता विद्यर्थी पालक तणावाखाली आहेत. आणि पुन्हा एकदा शिक्षण विभागची ऑनलाईन प्रक्रिया फसल्याचे समोर आले आहे

Web Title: Will the first list of eleven be announced at midnight?