शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या आमदारांना भाजपात घेणार?; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 12:32 IST

शिंदे गटातील नाराज आमदार भाजपात विलीन होणार असा दावा सामना मुखपत्रातून शिवसेना ठाकरे गटाने केला होता. त्यावर दानवेंनी हे स्पष्टीकरण दिले आहे

मुंबई - आम्ही कुठलाही राजकीय पक्ष फोडणार नाही, कुणाचं सरकार पाडणार नाही असं २०१९ पासून आम्ही सांगतोय. मविआच्या अंतर्गत वादामुळे सरकार पडलं तर त्याचा दोष भाजपाला देता येणार नाही. शिवसेनेच्या आमदारांविरोधात पराभूत झालेल्यांना ताकद देण्याचं काम मविआतील नेत्यांनी केले. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी उठाव केला. शिंदे गटातील आमदारांना भाजपात घेण्याचं कारण नाही कारण आम्ही दोघे एकच आहोत. एकत्र सरकार चालवतोय असं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केले आहे. 

शिंदे गटातील नाराज आमदार भाजपात विलीन होणार असा दावा सामना मुखपत्रातून शिवसेना ठाकरे गटाने केला होता. त्यावर दानवेंनी हे स्पष्टीकरण दिले आहे. दानवे म्हणाले की, आम्ही सरकार चालवत आहोत. आम्हाला उर्वरित काळ पूर्ण करून त्यापुढील ५ वर्षही सरकार आणायचं आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज आहेत वैगेरे असं उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले म्हणणार नाहीत तोवर त्यांच्याकडे शिल्लक असणारे आमदार स्वस्थ बसणार नाहीत. कारण त्यांच्याकडील अनेक आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. आपल्याकडे असलेले पळू नयेत म्हणून ही अफवा सोडली आहे असा दावा दानवेंनी केला. 

ज्याच्याकडे संख्याबळ तो राजातसेच संख्याबळाचा खेळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढली आणि त्यांच्याकडे संख्याबळ असले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात. लोकशाहीत ज्याच्याकडे संख्याबळ तो राजा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्याकडे संख्याबळ असल्याने पदावर आहेत. एकनाथ शिंदे यांना भाजपानं पाठिंबा दिल्यानं ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे संख्याबळाला महत्त्व आहे. कुणाच्या बोलण्यानं कुणीही मुख्यमंत्री होत नाही असं सांगत दानवेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला. 

दरम्यान, या राज्यातल्या राजकारणाचा कुणीच अंदाज लावू नका. राजकीय परिस्थिती जशी निर्माण होईल तसे वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील. जो निर्णय वरच्या पातळीवर होईल तो आम्ही पाळू. आता काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ता नसली तरी चालेल आहे ते टिकले पाहिजे अशी भूमिका आहे. उद्धव ठाकरे हेदेखील अस्तित्व टिकवण्यासाठीच कुणाशीही युती करत आहेत असा टोलाही रावसाहेब दानवेंनी विरोधकांना लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा