शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेपूर्वी नाथाभाऊंची भाजपामध्ये घरवापसी होणार? रक्षा खडसेंचे सूचक विधान; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 16:17 IST

BJP MP Raksha Khadse News: एकनाथ खडसे भाजपामध्ये परतण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

BJP MP Raksha Khadse News: गेल्या काही दिवसांपासून महायुतीत येणाऱ्या बड्या नेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. काँग्रेसचे मुंबईतील दोन मोठ्या नेत्यांनी महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केला. आता ते राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवडून गेले आहेत. यातच अनेक नेते भाजपासह महायुतीत येण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात असताना एकनाथ खडसे भाजपामध्ये घरवापसी होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. जागावाटप आणि उमेदवारीवर चर्चा सुरू आहेत. यातच एकनाथ खडसे यांच्या भाजपात परतण्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे. भाजपा खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनी याबाबत मनोगत व्यक्त केले आहे. मीडियाशी बोलताना रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर रक्षा खडसे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

लोकांची इच्छा तीच माझी इच्छा आहे

मागील अनेक दिवसांपासून हे चित्र आहे की, अन्य पक्षातील बडे नेते भाजपामध्ये येत आहेत. एकनाथ खडसे यांच्याबाबत अधिक काही सांगू शकत नाही, कारण तो वरिष्ठ पातळीवरील विषय आहे. पक्ष काय निर्णय घेतो, नाथाभाऊंचे त्यावर काय मत आहे, हे घडल्यानंतर सर्वांना समजेल. मात्र, नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून बरेच लोकांचीही ही इच्छा आहे की, नाथाभाऊंनी भारतीय जनता पार्टीत येऊन पुन्हा कामाला सुरुवात केल्यास लोकांना आनंद होणार आहे. लोकांची इच्छा तीच माझी इच्छा आहे, असे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, एकनाथ खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळाले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून या बातम्या माझ्यापर्यंत आल्या आहेत. मला वाटते तसे काही  प्रयोजन नाही. अजूनतरी कोणीही एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये परत घ्यायचे किंवा नाही, याबद्दल मला विचारलेले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांनी थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली.

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपा