शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?; शरद पवार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 11:36 IST

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपामध्ये नाराज असलेल्या खडसेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

औरंगाबादः गेल्या अनेक दिवसांपासून भाजपामध्ये नाराज असलेल्या खडसेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपानं तिकीट कापल्यापासून एकनाथ खडसे भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच खडसे राष्ट्रवादी जाणार असल्याचंही बोललं जात होतं. त्याच पार्श्वभूमीवर खडसेंनी नागपुरात येऊन शरद पवारांची भेट घेतल्यानं पुन्हा एकदा खडसे भाजपा सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपवर नाराज असलेल्या व गोपीनाथ गडावर झालेल्या जाहीर मेळाव्यात राज्यातील नेतृत्वावर तोफ डागणाऱ्या खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे पवारांची गुप्त भेट घेतली होती. विशेष म्हणजे खडसेंनी भेट घेतल्याच्या वृत्ताला शरद पवारांनीही दुजोरा दिला आहे. खडसे मला भेटून गेले त्यात काहीच शंका नाही. त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा झाली, पण खडसेंचं समाधान करण्याएवढी साधनसामग्री माझ्याकडे नाही, असंही पवार म्हणाल्यानं अनेक शंका-कुशंकांना व्यक्त केल्या जात आहेत.  तत्पूर्वी नागपुरात दाखल झाल्यानंतर खडसेंनी भाजपा सोडणार नसल्याचंही म्हटलं होतं. मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपा सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र, गेल्या 5 वर्षांत खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी जाहीर व्यासपीठावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच, पंकजा पक्ष सोडून जाणार नाही, माझं सोडून द्या, असे म्हणत बंडखोरी होण्याची शक्यता त्यांनी सूचवली होती. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार की पक्षातच राहणार? हे येत्या काळात समजणार आहे. याच, पार्श्वभूमीवर अनेकदा एकनाथ खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु होती. पण खडसेंनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असले तरी त्यांच्याशी वरिष्ठ पातळीवरून संपर्क सुरू आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. भाजपामध्ये महाराष्ट्रात सर्वांनीच उत्तम काम केले आहे. मात्र, सर्वांच्याच मनासारखे होईल, असे नसते. आपल्या मनाविरुद्ध काही घडले असले तरी कार्यरत राहणे हीच भाजपाची शिकवण आहे. खडसे हे पक्षातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांना यासंदर्भात सर्व काही कल्पना आहे. त्यामुळे पक्षाची चौकट ते मोडणार नाहीत, असेही मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार