शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससह समविचारी पक्षांना घेऊन निवडणूक लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 05:45 IST

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक काँग्रेससह इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्यात येईल. सर्वांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे सांगितले.

मुंबई  - आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक काँग्रेससह इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्यात येईल. सर्वांशी चर्चा झाली आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षाची निवड करण्याबाबत पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे पाटील शुक्रवारी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून अध्यक्षाची निवड करतील, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले.या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहिले असते तर बरे झाले असते, असे सांगून खा. पवार म्हणाले, भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांना भेटले. कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्याबाबत कोर्टाचा अंतिम निर्णय होईल त्यावेळी माझ्यासह राज्यातील जनतेला खरा आनंद होईल. पहिल्या टप्प्यात यश आले आहे. दुसºया टप्प्यातही यश मिळेल, अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली.निवडणुका जवळ आल्याने मुंबईत संघटनेला व्यवस्थित असा चेहरा द्यायचा आहे. यश-अपयश येतच असते. परंतु विचार आणि बांधिलकी कायम ठेवायची असते. जुन्या लोकांना बरोबर घेऊन नवीन चेहºयांना संधी द्यायला हवी. अधिक उत्साहाने काम करणारे व सर्व घटकातील लोक पुढे आणण्याची गरज असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.यावेळी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पक्षाचे उपाध्यक्ष नवाब मलिक, खासदार माजिद मेमन, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार विद्या चव्हाण आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसElectionनिवडणूक