शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेवर काँग्रेस देणार वेगळा चेहरा?; कदम, जगताप यांची मुदत संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 08:17 IST

डिसेंबर महिन्यात रामदास कदम (शिवसेना) आणि भाई जगताप (काँग्रेस) यांची विधान परिषदेची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. 

- मनोहर कुंभेजकरमुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा घोळ एकीकडे  कायम असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सदस्यांची निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात रामदास कदम (शिवसेना) आणि भाई जगताप (काँग्रेस) यांची विधान परिषदेची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. भाई जगताप हे विधान परिषद आमदार असून सध्या ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांना पुन्हा संधी देण्याऐवजी त्यांच्यावर पालिका निवडणुकीची जबाबदारी कायम ठेवण्याकडे पक्षाचा कल असल्याचे समजते. तसेच त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर  माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, डॉ. अमरजीत सिंह मनहास, माजी मंत्री नसीम खान, मधू चव्हाण, सचिन सावंत यांच्यापैकी एका नावाचा विचार होऊ शकतो, असे वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणूक ही भाई जगताप यांची कठोर परीक्षा घेणारी ठरणार आहे. मुंबई काँग्रेसमध्ये पदनियुक्त्या करताना बराच गोंधळ झाला. शिवाय, कापाकापीच्या  राजकारणात प्रामाणिक पदाधिकारी बाहेर राहिल्याने पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या २५ जागाही येणे कठीण असल्याचे विधान काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याने केले आहे. गटबाजीच्या तक्रारीकाँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी संवाद साधणे कार्यकर्त्यांना कठीण जाते. त्यातच, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सोनल पटेल व आशिष दुआ यांच्याकडूनही फारसे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेतच. शिवाय, गटबाजीला प्रोत्साहन देत असल्याच्या तक्रारी आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना किमान एसईओ हे पदही मिळाले नाही, त्याबद्दलही नाराजी आहे.

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापcongressकाँग्रेसRamdas Kadamरामदास कदम