शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये सुरु ठेवणार की ऑनलाईन? दोन दिवसांत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 08:26 IST

उदय सामंत : विद्यापीठ कायद्यातील सुधारणेवरून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू ठेवायची की ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडायचा याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांबाबत निर्णय घेण्यासाठी अलीकडेच कुलगुरूंसोबत बैठक झाली. मात्र, यात कोणता निर्णय होऊ शकला नाही. दोन दिवसात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुलगुरूंची बैठक घेतली जाईल. यात महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. कोविडचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या आरोग्याला आमची प्राथमिकता आहे. दोन दिवसात बैठक घेऊन चर्चा करू. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभागाशी चर्चा करून महाविद्यालयांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

विद्यापीठ कायद्यातील सुधारणेवरून सुरू असलेल्या वादंगावर मंत्री सामंत यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तिसरी सुधारणा केल्यानंतर गैरसमज पसरवण्याचा काम काही लोक करत आहेत. हा कायदा करताना कोणत्याही घटकाला त्रास देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. राज्यपालांचे कोणतेही अधिकार काढून घेतलेले नाहीत. राज्यपाल हेच कुलपती आहे. त्यामुळे प्र-कुलपती हे कुलपतींनी प्रदान केलेल्या अधिकारांचेच पालन करतील. त्यामुळे प्रकुलपती म्हणजे राजकीय अड्डा होईल, कुलगुरु हे पक्षाचे असतील असा आरोप चुकीचा आहे. विद्यापीठ कायद्यातील सुधारणेमुळे अनेकांचे विद्यापीठातील आखाडे बंद होतील, आपल्याच लोकांची वर्णी लावण्याला चाप बसेल म्हणून विरोधाचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही सामंत यांनी यावेळी केला. 

समितीत तज्ज्ञांचा समावेशnराष्ट्रीय शिक्षण धोरणाला अनुसरून विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यात आल्याचे सांगून सामंत म्हणाले की, देशात अनेक राज्यात अशी व्यवस्था आहे. कुलगुरू निवडीसाठीच्या समितीवर राज्यपाल नियुक्त मग अध्यक्ष असणार आहेत. nया समितीत तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. सिनेट सदस्यांबाबतही कुलगुरूंना जी नावे हवीत ती त्यांनी राज्य सरकारकडे पाठवावी. राज्य सरकार ती नावे राज्यपालांकडे पाठविणार अशी व्यवस्था आहे. गुणवत्ताधारक, पत्रकार, पद्य पुरस्कार प्राप्त, महिलांचे प्रतिनिधी, पर्यावरण शास्त्रज्ञ यांची निवड यानिमित्ताने करता येणार आहे. आधी फक्त सामाजिक कार्यकर्ते असायचे आता आम्ही या सर्वाचा समावेश केल्याचे सामंत म्हणाले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयUday Samantउदय सामंतcorona virusकोरोना वायरस बातम्या