शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाजप राज्यसभेची जागा अजित पवार गटाला देणार? १२ जागांसाठी ३ सप्टेंबरला निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 06:46 IST

सातारच्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेची जागा आम्हाला मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार भाजप आता राज्यसभेची एक जागा त्यांना देणार का याबाबत लवकरच निर्णय होईल.

मुंबई : महाराष्ट्रासहित नऊ राज्यांत रिक्त असलेल्या राज्यसभेच्या १२ जागांसाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी निवडणुका होणार  असून, त्याच दिवशी निकाल लागेल. यात महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे राज्यसभा सदस्य लोकसभेवर गेल्याने या दोन जागा रिक्त होत्या. महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता दोन्ही जागा त्यांनाच मिळणार हे स्पष्ट आहे. मात्र, भाजप दोन्ही जागा स्वतःकडे घेणार की एक जागा अजित पवार यांना देणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.   

सातारच्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेची जागा आम्हाला मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार भाजप आता राज्यसभेची एक जागा त्यांना देणार का याबाबत लवकरच निर्णय होईल. महायुतीमध्ये तसा निर्णय झालेला आहे, असेदेखील पवार यांनी म्हटले होते. मात्र याबाबत भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.  

भुजबळ की पाटील? वाई येथे प्रचारसभेत अजित पवार असेही म्हणाले होते की, तुम्ही उदयनराजे भोसले यांना लोकसभेवर पाठवा, नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवू. नितीन पाटील हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. अजित पवार गटाचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे ते बंधू आहेत. 

छगन भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे. एक जागा अजित पवार गटाला मिळाली तर भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवले जाईल की शब्द दिल्याप्रमाणे नितीन पाटील यांना संधी दिली जाईल, याबाबत उत्सुकता आहे.  

भाजपकडून कोण? भाजपकडून वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. लोकसभेला उमेदवारी नाकारण्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी की विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे नाव निश्चित करावे याबाबत पक्षात खल सुरू आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा