विमानसेवा सुरू होणार ?

By Admin | Updated: November 12, 2015 03:05 IST2015-11-12T03:05:01+5:302015-11-12T03:05:01+5:30

शहरात विमानतळ साकारल्यानंतर आता येथून विमान सेवा सुरू होईल, अशी भाबडी अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे.

Will the airline start? | विमानसेवा सुरू होणार ?

विमानसेवा सुरू होणार ?

नाशिक : शहरात विमानतळ साकारल्यानंतर आता येथून विमान सेवा सुरू होईल, अशी भाबडी अपेक्षा नाशिककरांनी व्यक्त केली आहे. दोन-चार कंपन्यांनी सेवा सुरू केल्यानंतर एकदाची विमानसेवा सुरू झाल्याचे मानले जात होते. मात्र एकामागोमाग एक सर्व कंपन्यांना सेवा गुंडाळावी लागली.
शासनाने आता नागरी विमान वाहतूक धोरणात केलेले बदल आणि त्या अनुषंगाने ‘एचएएल’ने विमानसेवेसाठी निविदा मागविल्यामुळे नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नाशिकमधून हवाई सेवा सुरू होण्यासाठी वेळोवेळी उद्योजक आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला. आधी नागरी विमानतळ व्हावे, ही अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण झाल्यानंतरदेखील हस्तांतर मग पोलीस बंदोबस्त, कर्मचाऱ्यांच्या वेळा आणि त्यांचा अतिरिक्त मेहनताना अशा अनेक अडचणींमुळे सर्वात आधी ‘मेहेर’ ही सी प्लेन कंपनी, तर नंतर नाशिकच्याच श्रीनिवास एअरलाइनने नाशिक आणि पुणे सेवा सुरू करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. सी प्लेन कंपनीने सुरू केलेली नाशिक-पुणे सेवा एका आठवड्यातच बंद पडली. तर कुंभमेळ्याच्या निमित्ताने मुंबई येथून नागरिकांना नाशिक येथे आणून तेथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी नेऊन पुन्हा नाशिकमार्गे मुंबईस नेण्याच्या सेवेस जेमतेम यश मिळाले. मात्र त्यानंतर ही सेवाही बंद पडली.
एअर इंडियाने आता सेवा सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शवली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच श्रीनिवास एअरलाइननेही पुन्हा सेवा सुरू करण्याची तयारी केली आहे. तथापि, आता एचएएलने विमान सेवा सुरू करण्यासाठी निविदा मागविल्याने अनेक कंपन्या पुढे येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाशिककरांचे रखडलेले विमानोड्डाण पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Will the airline start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.