वनरक्षकाची ठाण्यात आत्महत्या
By Admin | Updated: May 10, 2014 20:54 IST2014-05-10T20:22:35+5:302014-05-10T20:54:02+5:30
बोरीवली वनविभागाचे वनरक्षक दत्तात्रेय विश्वनाथ वाघचौरे (४२) यांनी शनिवारी दुपारी ठाण्यातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

वनरक्षकाची ठाण्यात आत्महत्या
ठाणे- बोरीवली वनविभागाचे वनरक्षक दत्तात्रेय विश्वनाथ वाघचौरे (४२) यांनी शनिवारी दुपारी ठाण्यातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वागळे इस्टेट हाजुरीतील शिवसेना शाखेजवळ राहणारे वाघचौरे हे मागील दोन महिन्यांपासून निलंबित होते. तसेच त्यांना दारुचे व्यसन होते. सकाळी त्यांची पत्नी कामाला गेल्याने ते घरात एकटेच होते. याचदरम्यान त्यांनी गळफास घेतला असून त्यांची पत्नी दुपारी कामावरून घरी आल्यावर ही घटना उघडकीस आल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.
(प्रतिनिधी)