मुलगीच झाली म्हणून पत्नीचा गळा चिरून खून
By Admin | Updated: November 28, 2014 02:21 IST2014-11-28T02:21:31+5:302014-11-28T02:21:31+5:30
सलग पाच मुली झाल्याने चिडून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला.

मुलगीच झाली म्हणून पत्नीचा गळा चिरून खून
मंगळवेढय़ातील घटना
मंगळवेढा : सलग पाच मुली झाल्याने चिडून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. ही घटना गुरुवारी पहाटे बोराळे (ता. मंगळवेढा) येथे घडली.
राणी बाजीराव वाघमारे (3क्) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत पती बाजीराव दामोदर वाघमारे (4क्) याला पोलिसांनी अटक केली आहे.बाजीराव वाघमारे याचा 2क्क्4मध्ये कासेगाव (ता. पंढरपूर) येथील राणी माने हिच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांना पाच मुली झाल्या. मुलगा न झाल्याने गुरुवारी पहाटे 4 वाजता पत्नीचा गळा चिरला व तद्नंतर त्याने तिच्या हातावर, डोक्यावर वार केले. पती बाजीराव याला ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)