पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 02:25 IST2017-05-13T02:25:52+5:302017-05-13T02:25:52+5:30

पतीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. या प्रकरणी सासूने तक्रार केल्यानंतर जावयाला अटक करण्यात आली.

Wife's suicide by tearing her husband's jaw | पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : पतीच्या नेहमीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना विरारमध्ये घडली आहे. या प्रकरणी सासूने तक्रार केल्यानंतर जावयाला अटक करण्यात आली.
पनवेल येथे राहणाऱ्या रेणूचे विरारमधील जॉन सेम्युअल याच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर पतीकडून तिला वेळोवेळी मारहाण केली जात होती. नेहमीच्या या जाचाला कंटाळून रेणूने मनवेलपाडा विरार येथील घरी बेडरूममधील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी रेणूच्या आईने विरार पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, जॉनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Wife's suicide by tearing her husband's jaw